आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियावरील हल्ल्याची अमेरिकेकडून चाचणी, चीनचा अमेरिका समर्थक देशांना सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरियावरील ‘मर्यादित लष्करी कारवाई’साठी अमेरिकेने भूमध्य आणि तांबड्या समुद्रात नौदलाची जोरदार तयारी चालवली आहे. मंगळवारी अमेरिका आणि इस्रायलने भूमध्य सागरात संयुक्त चाचणी घेतली. सकाळी सव्वानऊ वाजता ‘स्पॅरो’ हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. ही चाचणी म्हणजे सिरियावरील हल्ल्याची पूर्वतयारी असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, रशियानेही आपले एसएसव्ही-201 प्रायसोव्हे हे टेहळणी विमान भूमध्य सागराच्या दिशेने पाठवले आहे. चीनने संयुक्त राष्ट्राच्या निरीक्षक पथकाचा अहवाल येईपर्यंत प्रतीक्षा करण्याचा सल्ला अमेरिका सर्मथक देशांना दिला आहे.


कसा होईल हल्ला?
सिरियाचे सार्मथ्य
900 जमिनीवरून हवेत मारा करण्याच्या क्षमतेची क्षेपणास्त्रे
4000 हून अधिक विमानरोधी तोफा हल्ल्याच्या निशाण्यावर..
इनसर्किलिक हवाईतळ, तुर्कस्तान


ब्रिटन
एचएमएस इलस्ट्रियस
एसएमएस माँट्रोस आणि एचएमएस वेस्टमिनिस्टर
अँफिबियस जहाज एचएमएस बुलवार्क
टॉमहॉक क्षेपणास्त्रांनी सज्ज ट्राफल्गर र्शेणीतील पाणबुडी
अक्रोतिरी हवाई तळ, सायप्रस


ब्रिटनचा सहभाग
@रॉयल नौदलाच्या रॅपिड रिअँक्शन फोर्सची भूमध्य समुद्रात युद्धाभ्यास करण्यास अनेक दिवसांची इच्छा आहे.
@ 10 लढाऊ जहाजे एड्रियाटिक समुद्रात तैनात आहेत. त्यात एचएमएस इलस्ट्रियस, हेलिकॉप्टर वाहक आणि दोन टाइप-23 फ्रिगेटचा समावेश आहे.
@जिब्राल्टरच्या खाडीत तैनात असलेल्या एचएमएस टायरलेस ट्राफल्गर पाणबुडीतून क्षेपणास्त्रे डागली जाऊ शकतात.
@सिर‍ियावर हवाई हल्ला चढवण्यासाठी आरएएफ अक्रोतिरी तळ सर्वात उत्तम ठिकाण आहे. हा तळ ते अमेरिकेला वापरण्यासाठी देऊ शकतात.


उघड कारणे
0राष्ट्राध्यक्ष असद आणि त्यांचे सरकार हटवणे.
0रासायनिक व अन्य हल्ल्यांपासून लोकांचे संरक्षण करणे.
0गृहयुद्ध संपुष्टात आणून लोकशाहीची स्थापना करणे.
0अल-कायदासह अन्य दहशतवादी संघटनांचा बीमोड करणे.

भूमध्य सागर
पाच विध्वंसक लढाऊ जहाजे तैनात. सामान्य स्थितीत दोनच जहाजे गस्त घालत असतात. या जहाजांवर 1500 किलोमीटरपर्यंतची मारक क्षमता असलेली टॉमहॉक क्षेपणास्त्रे आहेत. पाच जहाजांवर 200 क्षेपणास्त्रे आहेत.


तांबड्या समुद्रात पाच जहाजे
यूएसएस मिनिट्झ आणि चार अन्य विध्वंसक लढाऊ जहाजे. मिनिट्झ अरबी समुद्रातून तांबड्या समुद्राच्या दिशेने जात आहे.


300 अमेरिकी मरीन्स रवाना
सुमारे 300 अमेरिकी मरीन्स आणि अत्याधुनिक दळणवळण यंत्रणेने सज्ज असलेले यूएसएस सॅन अँटोनियो भूमध्य समुद्राकडे रवाना झाले आहे.


* अमेरिकी काँग्रेसचा सोमवारी निर्णय


निशाण्यावर..
0स्पेशल फोर्स कमांड 0रिपब्लिकन गार्ड
0राष्ट्रीय संरक्षण मुख्यालय 0राष्ट्राध्यक्ष भवन 0संरक्षण मंत्रालय 0मेजेह हवाई तळ 0चौथी आर्र्मड ब्रिगेड 010 वी मॅकेनाइज्ड डिव्हिजन 0दमास्कस विमानतळ 0पहिली आर्मड ब्रिगेड
मर्ज रुहाइल लष्करी तळ

छुपी कारणे
सिरियातील तेलसाठय़ावर ताबा मिळवणे. तेलसाठय़ाबाबत सिरिया हा जगातील 33 व्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. तेथे 250 कोटी बॅरल तेलसाठे आहेत. अमेरिकेने आजपर्यंत हल्ले केलेले सर्व देश तेल उत्पादक आहेत.

राजकीय उलथापालथ
सिरियाच्या बचावासाठी रशिया आणि चीन लष्करी मदत पाठवू शकतात. त्यामुळे दोन ध्रुवीय युद्धाची शक्यता वाढीस लागेल. संयुक्त राष्ट्राला मग मध्यस्थी करावी लागेल.


आर्थिक नुकसान
तेलाचे भाव प्रतिबॅरल 50 डॉलरने वाढण्याची शक्यता. सध्या तेलाची किमत 108 डॉलर प्रतिबॅरल आहे. ती वाढून 160 डॉलर प्रतिबॅरलवर जाण्याची शक्यता आहे.


भारतावर परिणाम
जगभरातील तेलाच्या किमती वाढल्यामुळे भारतातही तेलाच्या किमती वाढतील. राजकीय व मुत्सद्देगिरीच्या पातळीवर देशावर फारसा परिणाम होणार नाही


युद्धाचे धोके
0जेव्हा असद आपल्या स्कड क्षेपणास्त्राच्या ताफ्याने हल्ले चढवू लागतील तेव्हा खरा धोका वाढेल. या क्षेपणास्त्रांवर रासायनिक शस्त्रेही लोड केली जाऊ शकतात.
0ब्रिटिश व अमेरिकी क्रुझ क्षेपणास्त्रांनी फारसे नुकसान होणार नाही. कारण ही क्षेपणास्त्रे ज्या ठिकाणासाठी डागली जातील तेथे पडतील.
0ठरावीक ठिकाणांवरच हवाई हल्ले करण्यात येणार असल्यामुळे सामान्य माणसांच्या मृत्यूचे प्रमाण अत्यंत नगण्य असेल, असा दोन्ही लष्कराच्या कमांडर्सचा दावा आहे.
0सिरियाच्या क्षेपणास्त्रांचा रोख तुर्कस्तान, जॉर्डन, सायप्रस व इस्रायलच्या दिशेने असू शकतो.
0संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत सिरियामध्ये झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या विरोधात अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स ठराव मांडू शकतात.
0रशिया आणि चीन आपल्या व्हेटो म्हणजे नकाराधिकाराचा वापर करू शकतात.
0संयुक्त राष्ट्राने 2005 मध्ये आणलेल्या सिद्धांतावर अमेरिका आणि त्याचे पाठीराख्या देशांत एकमत होऊ शकते. हा ‘संरक्षणाच्या जबाबदारी’चा सिद्धांत आहे. एखाद्या देशात सामूहिक हत्याकांड, युद्ध गुन्हे, वांशिक हत्या किंवा अन्य प्रकारच्या अमानवी घटना घडल्या तर हा सिद्धांत लागू केला जातो.
0एकदा हा सिद्धांत लागू झाला की अमेरिका आणि त्याचे पाठीराखे देश सिरियावर हल्ला करण्याच्या आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करू शकतात.
0भूमध्य समुद्रातील लढाऊ जहाजे आणि पाणबुड्यांद्वारे टॉमहॉक क्रुझ क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला.
0सिरियाला नो फ्लाय झोन घोषित करून चारही बाजूंनी हल्ला चढवणे.
0तुर्कस्तान, सायप्रस, जॉर्डन आणि कुवेतमधूनही हवाई हल्ला.
0जर कोसोवोची पद्धत स्वीकारली तर बंडखोर सैनिकांना शस्त्रास्त्रे पुरवणे आणि लष्करी ठाण्यांवर हल्ले चढवणे.
0सिरियाची सर्व लष्करी ठाणी उद्ध्वस्त करून असद यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडणे.
0बॉम्बमारक विमानांद्वारे बॉम्बचा वर्षाव.