आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Talent Search TV Show News In Divya Marathi

अमेरिकेतील टॅलेंट सर्च शोची जगभरात धूम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२००५ मध्ये टीव्ही दिग्दर्शक सायमन कोवेल आपल्या किचनमध्ये टीव्हीवर ब्रिटनची एक गायन स्पर्धा पाहत होते. अचानक त्यांच्या डोक्यात आयडिया आली की, नृत्यावर आधारित शो बनवला तर... ते आठवून सांगतात की, मी टीव्हीवर एखादा खून होताना पाहण्याऐवजी नाचणारे कुत्रे पाहणे पसंत करीन. सुमारे दहा वर्षांनी त्यांची ही कल्पना जवळपास जगभरात लोकप्रिय झाली आहे. २००६ मध्ये अमेरिका गॉट टॅलेंट शो सुरू झाला होता. सर्वात अगोदर फ्रान्समध्ये असा शो (इन्क्रोयोबल टॅलेंट) सुरू झाला. त्यानंतर अर्जेंटिना, व्हिएतनाम, अझरबैजानसह कित्येक देशांमध्ये टॅलेंट शो छोट्या पडद्यावर झळकले.

कॉवेल यांचे शो अमेरिकन आयडॉल आणि एक्स फॅक्टरचे रेटिंग वाढते घटते राहिले आहे. परंतु एनबीसी वाहिनी अमेरिका गॉट टॅलंटचे रेटिंग नेहमी शिखरावर राहिली. शोच्या ६६ आवृत्त्या जभरात सुरू आहेत. गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये रिअॅलिटी टीव्ही फॉरमॅटमध्ये हा सर्वात यशस्वी शोच्या रूपात नोंद झाला आहे. अमेरिका गॉट टॅलेंटचा नववा सीझन १७ सप्टेंबरला समाप्त होईल. गॉट टॅलेंट साम्राज्याचा उदय यूट्यूबनंतर लोकांच्या घटना पाहण्याच्या सवयीशी जोडलेला आहे. कोवेल सांगतात, लोक इंटरेटवर रंजक व्हिडिओ पाहू लागले आहेत. मला खात्री आहे की, हा फॉरमॅट लोकांच्या पसंतीस उतरेल.

टॅलेंट शोने गेल्या काही वर्षांत अनेक ग्लोबल स्टार निर्माण केले आहेत. रेकॉर्डिंग आर्टिस्ट सुसान ब्रॉइल ब्रिटन गॉट टॅलेंटची देणगी आहे. अनेक प्रेरणादायी चेहरे समोर आले आहेत. उदाहरणार्थ, टाचेने पियानो वाजवणारा बिगरहातांचा चिनी कलाकार, रुयूबिक क्यूब सोडवणारा स्वीडिश, कवितेच्या रूपात गद्य सादर करणारा दक्षिण आफ्रिकन आदी. २०१२ मध्ये ब्रिटन गॉट टॅलेंटच्या सहाव्या सीझनचा विजेती अॅशली आणि पुडसे या नाचणार्‍या कुत्र्यांची जोडी बनली.