आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टी लाईफला मुकले चंगळवादी अमेरिकी, हॉटेल व्यवसाय अडचणीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदीने त्रस्त असलेल्या अमेरिकेतील नागरिकांना मौज-मस्ती आणि पार्टी लाईफला दोन हात दूर ठेवावे लागत आहे. याचा सरळसरळ परिणाम बार आणि हॉटेल व्यवसायावर झाला आहे. 20 अब्ज डॉलरच्या या इंडस्ट्रीवर 3,75,746 लोक अवलंबून आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्या उत्पन्नात वेगाने घसरण सुरु आहे. याचे सर्वात मोठे कारण, अमेरिकेतील बेरोजगारी आणि त्यांच्या उत्पन्नातील घसरण हे आहे.

हॉटेल व्यवसायातील लोकांचेही त्यामुळे शोषण होत आहे. हॉटेल व्यवसायात काम करत असलेल्या आणि ग्लॅमरच्या झगमगीत दुनियेत काम केलेल्या काही तरुणींनी याचे बेगडी वास्तव जगासमोर आणले आहे. बार मालक तरुणींचे शोषण करतात असे त्यांचे म्हणणे आहे. या मुलींना तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी त्यांच्यावर अनेक बंधने लादली जातात. मात्र, ग्राहकांकडून त्यांना टीप मिळाली नाही तर त्यांना जगणेही अवघड असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

बारमध्ये काम करणा-या या मुलींना बार टेंडर म्हटले जाते. एक माजी बार टेंडर रॉस सांगते, की आठवड्यात तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. त्याबदल्यात तीन हजार डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख 80 हजार रुपये महिन्याला मिळतात.