आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी नागरिकांना शीख व्यक्ती दहशतवादी ओसामा बिन लादेनसारखेच वाटतात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिका कितीही प्रगत असली तरी विविध समुदायांविषयी तेथील नागरिकांमध्ये प्रचंड अज्ञान दिसून येते. म्हणूनच अमेरिकी नागरिकांना शीख व्यक्ती दहशतवादी ओसामा बिन लादेनसारखेच वाटतात, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.


शीख परंपरेमध्ये पगडीला महत्त्व आहे; परंतु त्याविषयी अमेरिकेत बरेच गैरसमज आहेत. शीख अमेरिकन लीगल डिफेन्स अँड एज्युकेशन फंड व स्टेनफोर्ड विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यास प्रकल्प करण्यात आला. धक्कादायक म्हणजे बहुतांश अमेरिकी नागरिकांना चित्रातील शीख व्यक्ती शीख म्हणून धडपणे ओळखताही येत नाही. 70 टक्के नागरिकांची ही अवस्था आहे. शीख समुदायासाठी हे संशोधन खूप महत्त्वाचे आहे.