आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाण्यांची दुनिया : अमेरिकन लोकांना नाही आवडत एक डॉलरचे नाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकन लोकांची एक डॉलरच्या नाण्यामधील आवड घटत चालली आहे. बँकेने इतक्या प्रमाणात नाणी फेडरल रिझर्व्हला परत केली की, ट्रेझरी 2011 मध्ये त्यांची निर्मिती बंद केली. एक डॉलरचे नाणे त्याच्या नोटेच्या तुलनेत आठ पट अधिक वजनदार आहे. लोकांना आवडत नसतानादेखील डॉलरच्या नाण्यांचे अस्तित्व कायम राहील. ते इतक्या पुरेशा प्रमाणात आहेत की, तीन चार दशके नवी नाणी तयार करण्याची आवश्यकताच नाही.
0 फेडरल रिझर्व्हने 2012 मध्ये 24 कोटी 20 लाख डॉलर मूल्याची नाणी बाजारात आणली. त्याला 25 कोटी डॉलरची नाणी परत मिळाली.
0 अमेरिकन बँकांमध्ये एक डॉलरची एक अब्ज चाळीस कोटी नाणी जमा आहेत. त्यांचे वजन पूर्ण भरलेल्या जंबो जेट विमानाइतके आहे.
0 सर्वसाधारण अमेरिकन चलनी नोटेचे सरासरी आयुष्य पाच वर्षे नऊ महिने असते. नाणे तीस वर्षे टिकते.
0 ब्रिटनमध्ये एक पौंड नकली नाणी बनण्याचे प्रमाण 2.7 टक्के आहे. ते नोटांच्या नकली असल्याच्या प्रमाणापेक्षा 0.001 टक्के कमी आहे.
0 युरो नाण्याच्या एका बाजूला युरोपियन झेंडा, दुसर्‍या बाजूस राष्ट्रीय चिन्ह असते. देशाच्या हिशेबाने ते बदलत असतात.
0 दृष्टिहीनांच्या सुविधेसाठी जपान, डेन्मार्कसह अनेक देशांच्या नाण्यांमध्ये छिद्र तयार केलेले असते.