आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Election In Marathi Women Swati Dandekar

नागपूरच्या स्वाती दांडेकर अमेरिकेच्या निवडणूक रिंगणात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- अमेरिकेतील कनिष्ठ सभागृह अर्थात काँग्रेसच्या लोवा निवडणुकीत भारतीय-अमेरिकन स्वाती दांडेकर उतरल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. लोवा प्रांत मंडळावरील माजी सदस्या असलेल्या दांडेकर यांनी 2003 ते 2009 दरम्यान मॅरिऑन मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. 2009 ते 2011 या काळात त्या याच मतदारसंघातून सिनेटवरदेखील निवडून गेल्या होत्या. दांडेकर मूळच्या नागपूरच्या आहेत. नागपूर विद्यापीठात त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्या बॉम्बे विद्यापीठात पदव्युत्तर पदवी झाल्या. 1973 मध्ये त्या लोवामध्ये दाखल झाल्या. आपल्या कार्यकाळात दांडेकर यांनी रोजगार निर्मितीवर भर दिला होता. त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांमध्ये त्या लोकप्रिय आहेत.