इंटरनॅशनल डेस्क - इराकमध्ये चालू असलेल्या संघर्षामुळे परदेशी नागरिक आणि देशोदेशीच्या दूतावासांवर संकटाचे ढग दाटून आले आहेत. अमेरिकेने आपल्या दूतावासाच्या सुरक्षेसाठी 200 आणखी सैनिक पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. 2003 मध्ये इराकवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने बगदादमध्ये आपले सर्वात मोठे दूतावास बनवण्याची घोषणा केली. ते 2009 मध्ये प्रत्यक्षात आलेही. अमेरिकेचे हे दुतावास जगातील सर्वात मोठे आहे. इराकमधून सैन्य मागे घेतल्यानंतरही पश्चिम आशियातील अमेरिकेच्या ताकदीचे ते शक्तीचे प्रतिक बनले आहे.
राजदूतावासाची वैशिष्ट्ये
* इराकची राजधानी बगदादमध्ये 40 लाख 70 हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात अमेरिकेचे राजदूतावास बनवण्यात आले आहे.
* आकार व्हॅटिकन शहरापेक्षाही मोठा आहे.
* 75 कोटी डॉलर खर्चवून बांधण्यात आलेले हे राजदूतावास जगातील सर्वात महागडे दुतावासांपैकी एक आहे.
* 15 हजारापेक्षा जास्त कर्मचारी राजदूतावासात कार्यरत आहेत.
* कार्यालय आणि कॉन्फ्रन्स हॉल व्यतिरिक्त 22 इमारती, राहण्यासाठी कॅफेटेरिया, जिम, टेनिस कोर्ट, थेएटर यासारख्या अनेक सुविधा राजदूतावासात उपलब्ध आहे.
* अमेरिकन राजदूतावासाचे आपले स्वत:चे वेगळे पॉवर स्टेशनही आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा अमेरिकेच्या राजदूतावासाची छायाचित्रे....