आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील चाकरमानी नोकरीवर नाराज कंपन्यांतील 70 टक्के कर्मचार्‍यांची भावना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेतील चाकरमानी मंडळी आपल्या नोकरीवर असमाधानी आहे. देशातील सुमारे 70 टक्के नोकरदारांनी अशी नाराजी दर्शवली आहे.
देशभरातील नोकरदारांच्या मानसिकतेचा जगप्रसिद्ध ‘गॅलप’ या संशोधन संस्थेकडून हा आढावा घेण्यात आला. अमेरिकेतील केवळ 30 टक्के कर्मचारी आपल्या पूर्ण क्षमतेने काम करतात, असे दिसून आले आहे. अमेरिकेतील कंपन्यांत कर्मचार्‍यांचे कामात रस नसणे आणि नाराजीचे सार्वत्रिकीकरण झाल्याचे पाहायला मिळू लागले आहे. गॅलपने 10 कोटी पूर्णवेळ कर्मचार्‍यांची पाहणी केली. कामात रस असलेले आणि मन लागत नसलेल्या कर्मचाºयांची वर्गवारी करण्यात आली. त्यात कामात अधिक सक्रियता दाखवणारा अशीही एक वर्गवारी करण्यात आली. कामाच्या ठिकाणी नाराज असलेले कर्मचारी केवळ स्वत:च नव्हे तर इतर कर्मचाºयांना सक्रिय काम करण्यापासून दूर करतात. ज्या कंपन्यांनी परदेशातील कर्मचारी कामावर ठेवले आहेत. त्या कंपन्यांत मात्र यापेक्षा वेगळे चित्र आहे. अशा कंपन्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले आहे.

550 अब्ज डॉलर्सचा फटका
कर्मचार्‍यांच्या मानसिकतेचा विषय केवळ नोकराचा वैयक्तिक प्रश्न नसून त्याचा परिणाम कंपनीच्या एकूण प्रगतीवर होऊ शकतो. कर्मचार्‍यांच्या नाराजीचा फटका अमेरिकेला दरवर्षी सरासरी 450 ते 550 अब्ज डॉलर्स एवढा बसतो.

कंपनीशी नाते
जे चाकरमानी मन लावून काम करत आहेत किंवा ज्यांच्या कामात उत्साह आहे. ते स्वत:चे कंपनीशी नाते असल्याची भावना ठेवतात. असेच कर्मचारी संघटनेत सृजनात्मक कार्य करतात, असे पाहणीतून स्पष्ट झाले आहे.