आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगणिस्तानात अमेरिकेचे अस्तित्व राहणार - केरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - अमेरिका अफगाणिस्तानमधून संपूर्णपणे माघारी फिरणार नाही. तेथे आमचे अस्तित्व राहील, असे अमेरिकी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान दौर्‍यावर आलेल्या केरी यांनी पाकिस्तानसोबत भारत व दहशतवाद्यांसंदर्भातील मुद्दय़ांवर चर्चा केली.

जॉन केरी म्हणाले, अमेरिका कालबद्ध कार्यक्रमानुसार अफगणिस्तानातून बाहेर पडण्यासाठी करार करेल. अमेरिका व पाकिस्तानदरम्यान सामरिक चर्चा सुरू होणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या मताशी त्यांनी संमती दर्शवली. पंतप्रधानांच्या विदेशी प्रकरणांचे सल्लागार सरताज अजिज यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषदेत केरी म्हणाले, दोन्ही देश मागील कटू अनुभव विसरून भविष्यातील वाटचालीसाठी गंभीर आहेत. 2011 मध्ये नाटो हल्ल्यामध्ये 24 पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण झाले. दरम्यान, ड्रोन हल्ले दोन्ही देशांतील संबंध सुधारण्यात अडसर ठरत असल्याचे अजिज यांनी म्हटले आहे.