आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Foreign Policy Expert Gets Loads Of Marriage Proposals From ISIS Terrorists After Her Tweet

ISISची \'ड्रीमगर्ल\' बनली अमेरिकन एक्सपर्ट, दहशतवाद्यांकडून विवाहाचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: अमेरिकेची परराष्ट्र धोरण विश्लेषक जेनिफर विलियम्‍स)

वॉशिंग्टन- अमेरिकेची एक महिला परराष्‍ट्र धोरण विश्लेषक मुस्लिम दहशवादी संघटना 'आयएसआयएस'च्या दहशवाद्यांची ड्रीम गर्ल बनली आहे. विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी जेनिफर विलियम्स यांनी विवाहाचा प्रस्तावही पाठवला आहे. जेनिफरने केलेल्या एका ट्वीटमध्ये तिने इस्‍लाम धर्म स्विकारल्याचे करण्‍याचे म्हटले आहे.

आयएसआयएस दहशवाद्यांविषयी ट्वीट करणारी जेनिफर अल्पावधीत लोकप्रिय ठरली आहे. अवघ्या 10 दिवसांत जेनिफरच्या फॉलोअर्सच्या संख्येत शंभर पटींनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे फॉलोअर्समध्ये आयएसआयएस समर्थकांची संख्या जास्त आहे.
बुरखा परिधान केल्यानंतर जेनिफर अधिक सुंदर दिसेल, असेही आयएसआयएसतर्फे केल्या ट्‍वीटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, जेनिफर विलियम्‍स ही वॉशिंग्टन डीसी स्थित ब्रुकिंग्‍स इन्स्टिट्यूशन सेंटर फॉर मिडल ईस्‍ट पॉलिसीत रिसर्च असिस्‍टेंट या पदावर कार्यरत आहे. जेनिफरने हिने गेल्या 23 सप्टेंबरला तिने एक ट्वीट केले होते. , 'मला माफ करा, मी दहशतवादी ‍विचारसरणी समजून घेतल्यानंतर 'कुरान' वाचले आणि इस्‍लाम धर्म स्विकारला आहे.' जेनिफर ही अमेरिकेतील टेक्‍सास मधील एका ख्रिश्चन कुटूंबातील आहे.

आयएसआयएसचे अनेक दहशतवादी आणि समर्थकांनी जेनिफरला लग्नाचा मागणी घातली आहे. या सगळ्यांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे की, ते इस्‍लामी संघटनांचे हिंसक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करतात. जेनिफरला अशाच एका नव्या फॉलोअर तिला लग्नाची मागणी घातली आहे. टि्वटरवर या फॉलोअरचे छायाचित्र असून त्याच्या हातात तलवार आहे. तसेच त्याच्या अकाउंटवरून आयएसआयएसद्वारा आतपर्यंत करण्‍यात आलेल्या हत्या आणि क्रुरकर्मा ओसामा बिन लादेनचे छायाचित्रे मोठ्याप्रमाणात पोस्ट करण्‍यात आली आहेत.

टि्वटरवर सुरु झाले विनोदी मोहिम...
दरम्यान, #MuslimApologies हॅशटॅगने 'टि्वटर'वर एक विनोदी मोहिम सुरु केली आहे. या माध्यमातून जगभरातील मुसलमानांना आवाहन करण्‍यात आले आहे की, आयएसआयएसद्वारा होणार्‍या हत्या आणि दहशवादी संघटनेला विरोध करण्याची विनंती करण्‍यात आली आहे. जेनिफरने या हॅशटॅगसोबत धर्म परिवर्तन केल्याचे जाहीर केले होते. जेनिफरच्या 'ट्वीट'वर खूप कमेंट आले आहे. आयएसआयएसचे दहशवादी आणि समर्थकांकडून जेनिफरचे ट्‍वीट मोठ्याप्रमाणात शेअर करण्‍यात आले आहे.

10 दिवसांत 100 टक्क्यांनी फॉलोअर्स वाढले...
जेनिफरने 10 दिवसांपूर्वी धर्म परिवर्तन केल्याचे 'ट्वीट' केले होते. तेव्हा तिच्या फॉलोअर्सची संख्या केवळ 60 होती. परंतु आज (4 ऑक्टोबर) तिच्या फॉलोअर्सची संख्या 6 हजारांवर पोहोचली आहे. फॉलोवर्समध्ये इस्‍लामिक स्‍टेटच्या समर्थकांची संख्या अधिक असून ते सगळे सौदी अरबमधील आहेत.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'फेसबुक'वरील जेनिफर विलियम्‍सचे काही फोटो...