आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American High Price Prostitute Allegedly Killed Google Executive And Ex Boyfriend With Drug Overdose

'सिरियल किलर' अ‍ॅलेक्स? जाणून घ्या, कोडं बनलेल्या हायप्रोफाइल कॉल गर्ल बद्दल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - ड्रग्जचा ओव्हर डोस देऊन गुगल एक्‍झिकेटीव्ह फॉरेस्ट हेजच्या हत्येच्या आरोपात अडकलेली कथित कॉल गर्ल अ‍ॅलेक्स टिकलमॅन सिरियल किलर तर नाही ना? असा प्रश्न अमेरिकन पोलिसांना पडला आहे. तिने आधीच्या बॉयफ्रेंडची देखील हत्या केल्याची शंका पोलिसांना आहे. त्या दिशेनेही तापस सुरु करण्यात आला आहे.
अ‍ॅलेक्स टीव्ही सिरियल 'डेक्सटर'चे प्रमुख पात्र सिरियल किलर डेक्सटर मॉर्गनने खूप प्रभावित झाली होती, असे तपासात उघड झाले आहे. गुगल एक्‍झिकेटीव्हच्या हत्येआधी ती डेक्सटरची भूमिका करणारा अभिनेता मायकलला देखील शिकार करणार होती, अशी चर्चा आहे. त्याचाही तपास पोलिस करत आहे. तिचा पूर्वाश्रमीचा बॉयफ्रेंड चाड कॉर्नेलने तिच्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. कॉर्नेलचा आरोप आहे, की तिने हेजची हत्या केली आणि त्याच रात्री त्याला फोन केला होता. तेव्हा ती अतिशय उत्तेजीत होती. कार्नेलचे म्हणणे आहे, की कदाचित ती त्याचाही खून करणार होती.
कोण आहे अ‍ॅलेक्स ?
अ‍ॅलेक्सबद्दल फारशी माहिती उघड झालेली नाही. तिच्या सोशल साइट्वरील प्रोफाइलनुसार, ती स्वतःला मेकअप आर्टीस्ट, लेखिका, मॉडेल आणि समुद्र किनार्‍यांचे वेड असलेली व्यक्ती मानते. तिने उत्तर अटलांटा येथील डुलुथ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. जॉर्जिया विद्यापीठातून तिने पत्रकारितेची पदवी घेतली. मात्र, तिने पत्रकारिता कधीही केली नाही. तिच्या फेसबुक प्रोफाइलनुसार, तिने लॅरी फ्लिंटच्या हस्टलर क्लबमध्ये काम केले असून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डान्सरची नोकरी देखील केली आहे.
सेक्स, ड्रग्ज आणि मृत्यू
याच महिन्यात अ‍ॅलेक्सला फॉरेस्टची हत्या, पुरावे नष्ट करणे आणि ड्रग्जच्या संबंधीत गुन्ह्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाच मुलांचा बाप असलेल्या 51 वर्षीय गुगल एक्‍झिकेटीव्ह फॉरेस्ट हेजने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अ‍ॅलेक्सला त्याच्या छोट्या जहाजावर बोलावून घेतले होते. त्याने तिला सेक्ससाठी हायर केले होते आणि हेरॉइन देखील मागवले होते. याच जहाजावर तो मृतावस्थेत आढळला होता. अ‍ॅलेक्सवर आरोप आहे, की तिने जाणूनबुजून हेजला ड्रग्जचा ओव्हर डोस दिला. जेव्हा हेजची प्रकृती बिघडली तेव्हा त्याला मदत करण्याएवजी तिने शांतपणे वाइन संपवली आणि स्वतःची बॅग घेऊन गुपचूप निघून गेली. हेजचा मृतेदह सर्वप्रथम जहाजाच्या कॅप्टनने पाहिला होता.
अ‍ॅलेक्सचा बचाव
अ‍ॅलेक्सच्या वकीलांनी म्हटले आहे, की हेजला मारण्याचा तिचा कोणताही इरादा नव्हता. ती असे कशासाठी करेल? असा प्रश्न उपस्थित करुन त्याने म्हटले होते, 'तिच्यासाठी तर हेज उत्पन्नाचा चांगला स्त्रोत होता. तिला हेज सोबतची रिलेशनशीप आणखी वाढवायची होती, असे असताना ती त्याला का मारेल?'
पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या हत्येचाही आरोप
अ‍ॅलेक्सवर तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर डीन रियोपेलेच्या हत्येचाही आरोप आहे. हेजच्या हत्येच्या दोन महिने आधीच डीनचा मृत्यू झाला होता आणि तो देखील ड्रग्जच्या ओव्हर डोसमुळेच. तेव्हा देखील त्याच्यासोबत अ‍ॅलेक्स होती. मात्र, तेव्हा तिने आपातकालिन क्रमांक 911 ला फोन केला होता आणि तिच्या मित्राने ड्रग्जचा ओव्हर डोस घेतल्याची माहिती दिली होती. रियोपेले एका संगीत रजनी स्थळाचा मालक होता.
अ‍ॅलेक्स आणि रियोपेले यांच्यातील संबंध शेवटी-शेवटी बिघडले होते. तिने रियोपेलेविरुद्ध पोलिसांना फोन करुन कौटुंबीक हिंसेची तक्रार केली होती. त्यावर त्याने सांगितले होते, की ती नशेत होती आणि तिने त्याच्या बोटाचा चावा घेतला होता. तसेच स्वतःच्या जीवाला काही करुन घेण्याची धमकी देत होती.