आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत हिंदू गौरव महिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकी हिंदूंच्या योगदानाबद्दल आदरभाव व्यक्त करत कॅलिफोर्निया सिनेटने हिंदूंच्या सन्मानार्थ ऑक्टोबर महिना जाहीर केला आहे.
हिंदू अमेरिकी समुदायाचे समर्थक सिनेटर एलीन कोर्बेट यांनी वॉशिंग्टन येथील हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या (एसएएफ) सहकार्याने ठरावाचा मसुदा तयार केला. विविध पार्श्वभूमीच्या हिंदू अमेरिकी नागरिकांचा सन्मान करण्यास आपल्याला आनंद होत आहे, असे त्यांनी सांगितले. विज्ञान, तंत्रज्ञान, व्यापार, कला आणि साहित्य या क्षेत्रात 3 लाख 70 हजार हिंदू अमेरिकींनी आपले योगदान दिले आहे. शिकागो येथे 1893 च्या धार्मिक परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी आम्हास हिंदुत्वाची ओळख करून दिली, असे त्या म्हणाल्या. कॅलिफोर्नियामध्ये हिंदूंची 50 मंदिरे आहेत. ठरावाला 55 गैरसरकारी संस्थांनी पाठिंबा दिला होता.
ऑक्टोबरमध्ये विविध कार्यक्रम