आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kayla Mueller Died In ISIS Captivity In Syrian Air Strike Claim ISIS

ISIS मुळे या मानवाधिकार कार्यकर्तीचा झाला दुर्दैवी अंत, भारतातही केले होते काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कायला मुलर केवळ 26 वर्षांची होती. या वयात तरुणी मौज-मस्ती करतात, दंगा घालतात, आयुष्याचा आनंद लुटतात. हे वयच तसं असतं. पण ती इतर मुलींसाराखी नव्हती. दुसऱ्यांसाठी तिनं आपलं जीवन वेचलं. इतरांना मदत करता करता मृत्यूच्या पाशात समावली. तिचा कायमचा अंत झाला. जिवन जगण्याची एकदा मिळालेली संधी पुन्हा मिळत नाही. तिनं ही संधीही इतरांसाठी उपयोगात आणली. इतरांचा विचार केला. या कायलाचा नुकताच मृत्यू झाला. कसा झाला हा एक मोठा वादाचा विषय असला तरी ISIS तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं निश्चितच सांगता येतं.
2013 पासून कायला ISIS च्या ताब्यात होती. पण ती ताब्यात असल्याचं ISIS नं कधीच जाहीर केलं नाही. सिरियातील अलेप्पो या शहरात काम करीत असताना या दहशतवाद्यांनी तिचं अपहरण केलं होतं. ती आंतरराष्ट्रीय मदत गटासाठी येथे काम करीत होती. जॉर्डननं केलेल्या हवाई हल्ल्यात तिचा मृत्यू झाल्याचं ISIS नं काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायात खळबळ उडाली. पण दहशतवाद्यांनीच तिला ठार मारल्याचंही सांगितलं जातं. तिला ठार मारुन जॉर्डनवर त्याची जबाबदारी टाकून या देशावर अमेरिकेचं दडपण आणण्याचा कट असल्याचं चर्चेत आहे. विशेष म्हणजे जॉर्डनच्या वैमानिकाची क्रूर हत्या केल्यानंतर जॉर्डननं ISIS च्या ठिकाणांवर जोरदार हल्ले सुरु केले आहेत.
तिचा अंत कसाही झाला असो, त्याला ISIS जबाबदार आहे हे मात्र नक्की. तिचं अपहरणच केलं नसतं तर तिचा कोणत्याही कारणानं का असेना मृत्यू झाला नसता. जग एका चांगल्या मानवाधिकार कार्यकर्तीला मुकला नसता. तिच्या कामात खंड पडला नसता. मुस्लिम असो किंवा तिबेटी कुणीही तिला मुकले नसते.
पुढील स्लाईडवर वाचा, केवळ सिरिया, इस्रायलमध्येच नव्हे तर भारतातही तिने केले होते काम... बघा जिवाला चटका लावणारे तिचे फोटो....