Home »International »Other Country» American Intelligence Agency Flop

गुप्तचरांचे अपयश म्हणून भारतीय अणुचाचण्या ठरवल्या फुसक्या

वृत्तसंस्था | Feb 24, 2013, 08:45 AM IST

  • गुप्तचरांचे अपयश म्हणून भारतीय अणुचाचण्या ठरवल्या फुसक्या

वॉशिंग्टन - अमेरिकेने आपल्या गुप्तचरांचे अपयश झाकण्यासाठी भारताच्या पहिल्या अणुचाचण्या अयशस्वी आणि फुसक्या असल्याचा दावा केला होता. माहिती स्वातंत्र्याअंतर्गत मागवण्यात आलेल्या कागदपत्रांमधून ही माहिती उघड झाली आहे. 24 जानेवारी 1996 तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी यानंतर अणुचाचण्या न करण्याचा निश्चय केला होता आणि तो क्लिंटन प्रशासनाने मान्य केला होता.

या कागदपत्रांमध्ये असेही म्हटले आहे की, 1974 मध्ये निक्सन प्रशासनातील अमेरिकन गुप्तचारांचे सर्व लक्ष रशिया - व्हिएतनाम युद्धावर केंद्रित होते. भारताच्या अणुचाचण्या त्यांच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट नव्हत्या. 18 मे 1974 रोजी भारताने केलेल्या अणुचाचण्या अमेरिकेला आश्चर्याचा धक्का देणार्‍या होत्या, अशी माहिती अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संग्रहालयाने (एनएसए) दिली आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार 1972 मध्ये अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयाच्या गुप्तचर व विश्लेषण विभाग (आयएनआर)ने निश्चित असा दावा केला होता की, भारत अणुचाचणी करण्याची तयारी करत आहे.

यासंदर्भातील कागदपत्रांचे विश्लेषण इंटरनेटवर जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, तुलनाच करायची झाली तर हे प्रकरण 2002- 03 मधील इराकसारखे होते. तेव्हा व्हाइट हाऊसची चिंता इतकी वाढली होती की, गुप्तचर विभागाने त्यांना हे मान्य करण्यास बाध्य केले होते की, सद्दाम हुसेन अतिसंहारक शस्त्रे बनवत आहेत. ‘ऑपरेशन स्माइलिंग बुद्धा’ या कूट नावाने राजस्थानातील पोखरणच्या वाळवंटात एका थर्मोन्यूक्लिअर डिव्हाइसद्वारे 1974 मध्ये आण्विक चाचणी घेण्यात आली होती. कमी क्षमतेमुळे अमेरिकन गुप्तहेर त्याचा माग काढू शकले नाहीत व त्यांनी त्याला फुसके ठरवले.

Next Article

Recommended