व्हर्जिनिया - आई वडिल आपल्या मुलांचे शक्य तेवढे सर्व हट्ट् पुरवण्याचा प्रयत्न करत असतात. पण अमेरिकेच्या एका व्यक्तीने आपल्या मुलांना एक साम्राज्यच गिफ्ट केले. जेरेमिया हिटन नावाच्या या व्यक्तीने इजिप्ट आणि सुदानच्या जवळ एका डोंगरावर आपला हक्क असल्याचा दावा केला आहे. ते त्यांची मुली एमिली येथील राजकुमारी, मुलगा राजकुमार आणि स्वतः राजा असल्याचे सांगतात. हिटन आणि त्यांच्या मुलांनी या परिसराचे नाव नॉर्थ सुदान साम्राज्य असे ठेवले आहे.
झेंडा रोवून केला हक्काचा दावा
हिटनने सांगितले की, काही दिवसांपूर्वीच त्यांनी पायी प्रवास करून त्याठिकाणी पोहोचला होता. त्यानंतर तेथे त्यांच्या मुलांना तयार केलेला झेंडा रोवला. हिटनच्या मते बीर ताविल नावाच्या या परिसरात सध्या कोणत्याही देशाचा दावा नाही. त्यामुळे हा झेंडा रोवल्यानंतर हा परिसर त्यांचा झाला आहे. सुदान आणि इजिप्त लवकरच त्यांच्या साम्राज्याला मान्यता देतील अशी त्यांना अपेक्षा आहे.
साम्राज्याचे स्वप्न सोपे नाही
रिचमंड युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या प्राध्यापक शेलिया कॅरापिको यांनी सांगितले की, हिटन आताच या परिसरावर आपल्या हक्काचा दावा करू शकत नाही. त्याचे कारण म्हणजे राजकीय हक्कासाठी संयुक्त राष्ट्र आणि शेजारी राष्ट्रांची कायदेशीर मान्यता मिळणे गरजेचे असते.
फाइल फोटो : जेरेमिया हिटन त्यांच्या एमिली या सात वर्षीय मुलीबरोबर.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा यासंबंधीची अधिक छायाचित्रे