लॉटरी जिंकल्यानंतरत आनंद व्यक्त करताना रॉबर्ट हॅमिल्टन
इंडियानापोलिस - "भगवान देता है तो छप्पर फाड के देता है" असे म्हणतात, मात्र याची प्रचिती अमेरिकेतील इंडियाना राज्यात एकाच व्यक्तीला नक्कीच आली आहे. या व्यक्तीला तीन महिन्यात दोन वेळा लॉटरी लागली आहे आणि ही लॉटर तब्बल एक मिलियन डॉलर (60250500 रुपये) एवढ्या किंमतीची आहे.
होसियर लॉटरीच्या अधिकार्यांनी सांगितले की, रॉबर्ट हॅमिल्टन या व्यक्तीने इंडियानापोलिसच्या एका दुकानावरून ही लॉटरी विकत घेतली असून त्याला एक मिलियन डॉलरचे बक्षीस लागले आहे. .याच वर्षाच्या एप्रिल महिन्यातही याच व्यक्तीला इंडियानाच्या पश्चिम भागातील जेसोनविले येथेही एवढ्याच बक्षीसाची लॉटरी लागली होती.
लॉटरी जिंकल्यानंतर हेमिल्टन म्हणाला की, या पैशाने तो पहिले आपल्यावर असलेली उधारी फेडणार आहे. त्यानंतर एक घर आणि एक मोटारसायकल घेण्याचा त्याचा विचार आहे.
पुढील स्लाईडवर.. पाहा या नशिबवान व्यक्तीचे आपल्या पत्नीसोबतचे फोटो...