लंडन - अमेरिकन अभिनेत्री, फॅशन डिझायनर जेसिका सिम्पसनला तिच्या लग्नात आई-वडील भांडण करतील याची भीती सतावत आहे. एरिक जॉन्सनसोबत तिचे पुढील महिन्यात लग्न होणार असल्याचे सांगण्यात येते. 33 वर्षीय जेसिकाच्या आई-वडिलांचा गेल्यावर्षी घटस्फोट झाला आहे. आई-वडील लग्न समारंभाचा बेरंग करतील, अशी भीती जेसिकाला आहे. यातून काय मार्ग काढावा हे तिला सुचत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 34 वर्षीय जॉन्सन माजी फुटबॉलपटू आहे.