आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Origine Islami Terrorist Death In Somaliya

अमेरिकन वंशीय इस्लामी अतिरेकी सोमालियात चकमकीत ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोगदिशू - सोमालियात गुरुवारी अल-कायदाशी संबंधित शबाब संघटनेच्या दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत एक अमेरिकीवंशीय इस्लामी अतिरेकी मारला गेला. उमर हम्मामी असे त्याचे नाव आहे.


अमेरिकेच्या अलबामामध्ये जन्मलेल्या या दहशतवाद्याची ‘अल अमेरिकी’या टोपण नावाने अधिक ओळख होती. सोमालियात लढणा-या परदेशी दहशतवादी गटाचा तो म्होरक्या होता. त्याच्या शिरावर अमेरिकेने 50 लाख डॉलर्स (सुमारे 31.83 कोटी रुपये )इनाम ठेवले होते.


अल-अमेरिकी 29 वर्षांचा होता.सन 2006 मध्ये तो सोमालियात आला होता.त्याने इंग्रजी भाषेतील रॅप गाणी आणि व्हिडीओच्या माध्यमातून अल-कायदाशी संबंधित शबाब संघटनेसाठी तरुणांची भरती केली होती. दक्षिण सोमालियातील बस्ती भागातील एका रहिवासी मोअलिम अली ने सांगितले की, दोन गटात तुंबळ धुमश्चक्री उडाली होती.त्यामध्ये अल अमेरिकी आणि आणखी दोन अतिरेकी मारले गेले. या दोघांपैकी एक परदेशी होता.त्याची ओळख होऊ शकली नाही. काही जण त्याला पाकिस्तानी तर काही नागरिक तो इजिप्तचा नागरिक असल्याचे सांगत होते.


अरुणाचलमध्ये ढगफुटी; इमारती कोसळल्या
अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीच्या घटनेत अनेक इमारती कोसळल्या, रस्ते वाहून गेले, पूल कोसळले. ही घटना 10 सप्टेंबर रोजी घडली. या भागातील अनेक नागरी वसाहती वाहून गेल्या. प्रदेशातील 80 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे.