आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Police Assault Indian Grandfather In Madison

भारतीय आजोबांना अमेरिकी पोलिसांनी असे जोरदार आपटले जमिनीवर, बघा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील मेडिसन सिटीत भारतीय आजोबांना दोन पोलिसांनी अटक करताना जमिनीवर कसे जोरदार आपटले असा हृदयाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ अमेरिकेतील अलबाला पोलिस विभागाने जाहीर केला आहे. पोलिसांनी जमिनीवर पाडल्यावर या आजोबांना स्वतःच्या पायावर धड उभेही राहता येत नव्हते. तोंडही फुटले होते. त्यांना लगेच पॅरॅलेसीसचा अटॅक आला. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. सध्या हे आजोबा खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
57 वर्षीय या आजोबांचे नाव सुरेशभाई पटेल असे आहे. मेडिसन सिटीत त्यांचा मुलगा चिराग राहतो. नातवाची देखभाल करण्यासाठी पटेल मुलाच्या घरी आले होते. दररोज सकाळी ते घराबाहेर फिरायला जात असत. 6 फेब्रुवारी रोजी दररोजप्रमाणे पटेल सकाळी फिरायला गेले होते. यावेळी दोन पोलिसांनी त्यांना थांबवले. पोलिसांना चिरागच्या शेजाऱ्यांनी फोन करुन बोलवले होते. एका संशयास्पद व्यक्ती घरासमोर फिरत असून गॅरेजमध्ये डोकावून बघत आहे, असे या शेजाऱ्यांनी फोनवरुन पोलिसांना सांगितले होते.

मुलाच्या घरासमोरच दोन पोलिसांनी पटेल यांना अटक करुन जमिनीवर जोरदार आदळले. या प्रकरणी एरिक पार्कर नावाच्या पोलिसाला अटक करण्यात आली असून सामान्य नागरिकाला शारीरिक त्रास दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
मी इंग्रजी बोलू शकत नाही, असे पटेल यांनी यावेळी पोलिसांना सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी चिरागच्या घराचा नंबर पोलिसांना सांगत त्याकडे बोटही दाखवले होते. पटेल यांनी बऱ्याच वेळा इंडिया या शब्दाचा प्रयोग केल्याचे व्हिडिओत ऐकू येते. परंतु, पोलिसांनी लगेच त्यांना जमिनीवर आदळले. आता त्यांचा एक पाय जायबंदी झाला असल्याचे चिरागने सांगितले आहे.
अरे ही व्यक्ती इंग्रजी बोलू शकत नाही, असे एरिक या व्हिडिओत म्हणताना दिसून येतो. पोलिसांनी जमिनीवर धाडकन आपटल्यावर पटेल हलूही शकत नव्हते. जेव्हा तिसरा पोलिस घटनास्थळी आला त्याने पटेल यांना विचारले, की तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहू शकता का? त्यावेळी पटेल उभे राहण्याच्या अवस्थेतही नव्हते. त्यानंतर मात्र या पोलिसांना घाम फुटला.
या घटनेबद्दल मॅडिसन पोलिस विभागाने पटेल कुटुंबीयांची माफी मागितली आहे. या प्रकरणी अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयनेही तपास सुरु केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, दृदयाचा थरकाप उडवणारा या घटनेचा व्हिडिओ... आणि फोटो...