आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी राजकारणात घराणेशाहीचा प्रभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका कोणत्याही व्यक्तीला कुलीनतेची अथवा श्रेष्ठत्वाची पदवी देणार नाही, असा त्या देशाच्या केंद्रीय राज्यघटनेत स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, राजांना नाकारणा-या या देशाच्या लोकांना राजकुमार व राजकुमारींची कायमच आवड राहिलेली आहे, असा त्यांचा इतिहास आहे. अमेरिकेच्या राजकीय क्षितिजावर कित्येक वर्षे अ‍ॅडम्स, हॅरिसन, टफ्ट, लाँज आणि केनेडी यांसारख्या घराण्यांची सत्ता दीर्घ काळ विविध स्तरांवरील पदांवर राहिलेली आहे. अमेरिकेच्या आधुनिक राजकीय इतिहासातही वंशवृक्षांचे पीक चांगलेच फोफावले आहे. इंडियाना, कॅलिफोर्निया, ओहियो, लुइसियाना, अरकन्सास, कोलोरॅडो, न्यू मेक्सिको आणि ओरेगॉन अशा विविध राज्यांमध्ये राजकारण्यांचे नातेवाईक महत्त्वाच्या पदांवर निवडले गेले आहेत.

2008 मधे बराक ओबामांनी क्लिंटन घराण्याचा पराभव केला. लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण वंशभेद करणारी मंडळी राजकारण करत असल्याची भावना लोकांमध्ये होती. मात्र कोणत्याही घराण्याशी संबंध नसलेले ओबामा नियम नव्हे, तर अपवाद होते. गेल्या 6 निवडणुकांत अध्यक्षपदाचे 4 उमेदवार मिट रोम्नी, जॉर्ज डब्ल्यू. बुश, प्रमुख राजनेत्यांचे पुत्र होते. पाचवे जॉन मॅक्केन नौसेनीतल अ‍ॅडमिरलचे पुत्र होते. 2016 ची निवडणूक लढत माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांची पत्नी हिलरी आणि माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे बंधु फ्लोरिडाचे माजी गव्हर्नर जेब बुश यांच्यात होण्याची शक्यता आहे. तीनदा निवडणूक लढवणारे रॉन पॉल यांचे पुत्र सिनेटर रेंड पॉल रिपब्लिकन पक्षाचे संभाव्य दावेदार असू शकतात. हिलरीने निवडणूक लढण्यास नकार दिल्यास माजी गव्हर्नर मारियो कुवोमोंचे पुत्र न्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू कुओमो डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांची मुलगी लिझ चेनी व्योमिंग राज्यातून सिनेटची निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. तीन वेळा निवडून लोकप्रिय रिपब्लिकन नेता माइक एन्जीच्या जागेवर ती कब्जा करू इच्छिते. ओबामांनी गेल्या महिन्यात माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडींची मुलगी कॅरोलिन केनेडीला जपानमधील पुढील दूत बनवण्याची इच्छा बोलून दाखवली.

2000 आणि 2004 मध्ये बुशच्या निवडणूक प्रचाराचे एक तज्ज्ञ मार्क मेकिनॉन सांगतात की, परिवर्तनाच्या अपेक्षेने नवे चेहरे निवडल्यानंतर मतदार सातत्य आणि अनुभवाला प्राधान्य देऊ शकतात. मतदारांना परिचित आडनावाची नवी व्यक्ती निवडण्यासाठी 2016 ची वाट पहावी लागणार नाही.

इलिनॉइसमध्ये राज्य विधानसभेचे अध्यक्ष मायकेल एडिगन यांची मुलगी अ‍ॅटॉर्नी जनरल लिसा एडिगन 2014 मध्ये गव्हर्नरपदाची उमेदवार समजली जात होती. पण ती आणखी एक राजकीय घराणे शिकागोचे माजी मेयर्सचा मुलगा आणि भाऊ बिल डेलीला स्पर्धा टाळण्यासाठी मैदानातून बाजूला झाली. जॉर्जियाचे माजी सिनेटर सॅम नन यांची मुलगी मिशेल ननने वडिलांच्या जुन्या जागी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

टेक्सासमध्ये जेब बुश यांचा मुलगा जॉर्ज पी. बुश लँड कमिश्नरपदाचे दावेदार आहेत. हे पद राज्यात उच्च पदी निवडले जाण्याची पायरी मानले जाते. डेमोक्रॅटिक पक्षात लोकांना वाटते की, क्लिंटन दाम्पत्य कन्या चेल्सियाला मोठ्या जागेसाठी तयार करत आहे. सिनेटचे नेते हॅरी रीड यांनी पुढील राष्ट्राध्यक्षासंबंधीवरील चर्चेत सांगितले की, जेब बुश किंवा हिलरी क्लिंटन किंवा त्यांच्या मुलीपैकी कोणीही (अध्यक्ष) असू शकतो.

चार राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार आणि ब्रुलिंग संस्थेचे फेलो स्टीफन हॅस म्हणतात, बहुतांश लोकांना वाटते की वंशभेदी राजकारण लोकशाहीविरोधी आहे. या मुद्यावर एका घराण्यात मतभेद स्पष्ट झाले आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बुश सिनियर यांची पत्नी बार्बरा बुश यांना त्यांच्या जेब या मुलाला 2016 च्या निवडणुकीविषयी विचारल्यावर ते म्हणाले, अगोदरच खूप बुश राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. इतर पुष्कळ माणसे आहेत ना! तर तिकडे जेब यांनी मोहिम सुरू केली आहे.

आधुनिक राजकारणात कठीण स्थितीत आनुवंशिकतचे खूप लाभ आहेत. घराण्यांच्या वारसदारांच्या समर्थकांचे नेटवर्क बनलेले आहे. राजकीय विश्लेषकांचे अनुमान आहे की, एकपेक्षा अधिक वेळा आमदार, खासदार बनलेल्या व्यक्तीच्या आणखी एखाद्या नातेवाईकाला इतरांच्या तुलनेत संसदेत जाण्याची संधी अधिक असते. राष्ट्रीय आर्थिक संशोधन संस्थेचे संशोधकांनी 1789 नंतरच्या राजकीय घराण्यांच्या अभ्यासात स्पष्ट केले की, दीर्घकाळा पदावर राहण्याचा संबंध राजकीय घराणेशाही निर्माण करण्याशी निगडीत आहे.

हे संशोधक लिहितात की, राजकारणात सत्तेतून सत्तेचा जन्म होत असतो. हॉर्वर्डचे संशोधक ब्रायन डी. फिनस्टीन यांनी 2010 मध्ये लिहिले होते की, राजकीय नेत्यांच्या मुलांना निवडणुकीत सामान्य उमेदवारांच्या तुलनेत 0.72 ते 7.90 टक्के अधिक मतदान मिळत असते.
-सोबत माइल्स ग्राहम