आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barack Obama, Ice Bucket Challenge,News In Marathi

बेनेडिक्ट कंबरबेक यांचा ५ वेळा आइस बकेटशी सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एएलएस आजारांसाठी मदत गोळा करण्याचा वेगळा प्रकार आइस बकेट चॅलेंज जगात प्रसिद्ध झाले. अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून ते प्रसिद्ध टीव्ही स्टार ओप्रा विन्फ्रेसारख्या सेलिब्रिरटीजनी या प्रयोगात सहभाग घेतला आहे, परंतु प्रसिद्ध ब्रिटिश कलावंत बेनेडिक्ट कंबरबेक यांना मात्र हे आव्हान खूप कठीण गेले. त्यांना या स्पर्धेत एकदा - दोनदा नव्हे, चक्क ५ वेळा भाग घ्यावा लागला. बाइक चालवताना, बगिच्यात, सूटमध्ये असताना त्यांच्यावर बर्फाचे पाणी टाकण्यात आले. त्यांचा व्हिडिओ नेटवर खूप वेळा पाहिला गेला. एका दिवसात दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिल्याचे स्पष्ट झाले होते. बेनेडिक्टचे नॉमिनेशन ब्रिटनचे अभिनेते टॉम हिडलस्टन यांनी केले होते.
buzzfeed.com