आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barack Obama Left To Cigarettes For Wife Scarred

बायकोच्या भीतीमुळे सोडले धुम्रपान; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची कबुली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - व्यक्ती कितीही सामर्थ्यवान असला तरी त्याला त्याच्या 'होममिनिस्टर' अर्थात त्याच्या पत्नीचे आदेश पाळावेच लागतात. मग याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तरी कसे अपवाद राहणार म्हणा, म‍िशेल ओबामा यांच्या भीतीमुळे बराक ओबामांनी सिगारेट सोडल्याचे आज (मंगळवारी) कबूल केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या वार्षिक अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर एका कार्यक्रमात बराक ओबामा बोलत होते. गेल्या सहा वर्षांपासून धुम्रपान केले नसल्याचे बराक ओबामांनी सांगितले. धुम्रपान सोडण्यामागे पत्नी मोठी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. मिशेल ओबामांच्या भीतीपोटी सिगारेट ओढणे सोडल्याचे ओबामांनी सांगितले.

सिगारेट हा व्यक्तीचा वीक पॉईंट मानला जातो. 2008 मध्ये अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ओबामा यांची धुम्रपानाची सवय व ती सोडण्याचे प्रयत्न, याबाबत चर्चा रंगली होती.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'मिशेल ओबामा बनल्या लेखिका...'