आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American President Barack Obama's Wife Michel Obama Defiance To Escort Officer

अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष ओबामांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मिशेल यांना धमकी देणारा व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत असलेल्याचीही माहिती समोर आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये तो एस्कॉर्ट अधिकारी म्हणून काम करीत होता. वॉशिंग्टन डीसी पोलिस या प्रकरणी चौकशी करीत आहे.
'वॉशिंग्टन पोस्ट'मधील वृत्तानुसार, मिशेल ओबामा यांना धमकी देणारी व्यक्ती व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी त्याची प्रशासकीय विभागात बदली करण्यात आल्याचेही समजते. मात्र, तो अधिकारी कोण आहे, हे समजू शकले नाही. मिशेल ओबामांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे सुरक्षा अधिकार्‍यांनी सांगितले.
मिशेल ओबामा ट्विटरला जॉइन; तासाभरात एक लाख फॉलोअर्स
द ओबामाज: मिशेल ओबामांचे मुंबईतील नृत्य ठरवून केलेला ड्रामा
मिशेल ओबांमांकडे आला अभिनयाचा प्रस्ताव