आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगणक सोडवणार बीजगणिताचे कठीण प्रश्न, अमेरिकी संशोधकांनी विकसित केली संगणक प्रणाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - बीजगणिताची ओळख करून देणार्‍या सुरुवातीच्या वर्गात हमखास दिसून येणारी अक्षरविषयक समस्या आपोआप सुटली तर? हे कोडे सोडवणारी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात संशोधकांना यश आले आहे. अशी समस्या आपोआप सोडवण्याची व्यवस्था त्यात असेल.
ही पद्धती शैक्षणिक साधन म्हणूनदेखील वापरता येऊ शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे. गणितातील शब्दविषयक समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना याची मदत होणार आहे. मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कॉम्प्युटर सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅबोरेटरी आणि वॉशिंग्टन विद्यापीठ यांच्या वतीने हा प्रयोग करण्यात आला. या तंत्राला मॅकसायमा असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे त्याच्या विकासाचे प्राथमिक मॉडेल 1960 मध्ये एमआयटीमध्ये तयार करण्यात आले होते. कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाच्या क्षेत्रात हा मैलाचा दगड ठरला होता. सुरुवातीला शाब्दिक प्रश्नाचे बीजगणितीय समीकरणात रूपांतर करण्यात आले. त्यानंतर दुसर्‍या पद्धतीने काही पारंपरिक शाब्दिक प्रश्नांचे बीजगणितीय समीकरणात रूपांतर करण्यात आले.
असा केला प्रयोग
2 हजार समस्यांचा एका मोठा संच या प्रयोगात वापरण्यात आला. त्यात 500 समस्या सोडवण्यात आल्या. त्यानंतर संगणकाला 500 पैकी 400 ढोबळ प्रश्न देण्यात आले. त्यातून ही पद्धती विकसित होण्यास मदत झाली. मॅकसायमाच्या साह्याने चाचणीचे 70 टक्के प्रश्न सोडवण्यात या व्यवस्थेला यश मिळाले. दुसर्‍या वेळी यातील 46 टक्के प्रश्न वगळण्यात आले.
असे चालते मॅकसायमाचे काम
मॅकसायमामधून बीजगणितातील समीकरणाच्या साह्याने समस्या सोडवली जाते. विश्लेषण आकृत्यांचा वापर करून समस्या सोडवली जाते. उदाहरणार्थ कुटुंब वृक्षाच्या रेखाटन जसे असते. तसेच आपल्या समस्येचे उत्तर अगदी सोप्या पद्धतीने मांडले जाते.
आणखीही उपयुक्तता
भूमिती, भौतिक आणि अर्थ विषयासाठी मॅकसायमा ही संगणकीय प्रणाली उपयुक्त ठरू शकते, असा दावा करण्यात आला आहे.