आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत भंगार गाड्यांचे भाडे 14 कोटी 52 लाख रु.

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅव्हेलर्टन (न्यूयॉर्क )- भंगार गाड्यांचे भाडे सुमारे 14 कोटी 52 लाख रुपये हे वाचून आश्चर्य वाटले असेल. अमेरिकेत ऑक्टोबर महिन्यातील सँडी वादळाच्या तडाख्यात हजारो नव्या कोर्‍या गाड्यांचीही वाट लागली. एकूण 18,000 भंगार गाड्या कंपन्यांनी रिव्हरहेड गावातील बंद पडलेल्या कॅव्हेलर्टन एअरपार्कच्या धावपट्टीवर आणून ठेवल्या.पर्यावरण संरक्षित जागेच्या नजीकच या भंगार गाड्या ठेवल्यामुळे पर्यावरणवादी ओरडत आहेत.परंतु पर्यावरणवादी निष्कारण ओरडत असल्याचे रिव्हरहेड गावच्या सुपरवायझरचे म्हणणे आहे. कारण भंगार गाड्या ठेवण्यासाठी कंपन्यांशी झालेल्या लीज करारापोटी या गावाला सुमारे 27 लाख डॉलर्स (सुमारे 14 कोटी 52 लाख रु.)मिळणार आहेत.