Home »International »Other Country» American Senate Member Strongly Supports Narendra Modi

अमेरिकेच्‍या खासदारांकडून मोदींची मुक्तकंठाने स्‍तुती, शबाना आझमींची टीका

वृत्तसंस्‍था | Feb 15, 2013, 11:36 AM IST

वॉशिंग्‍टन- युरोपियन युनियनने गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍यावरील बंदी उठविल्‍यानंतर आता अमेरिकेतही मोदीविरोधी वातावरण निवळत असल्‍याची चिन्‍हे दिसत आहेत. अमेरिकेच्‍या एका खासदाराने मोदींची मुक्तकंठाने स्‍तुती केली आहे. मोदींची दूरदृष्‍टी आणि विचारांचे समर्थन करायला हवे, असे या खासदाराने अमरिकेच्‍या सरकारला म्‍हटले आहे.

अमेरिकेचे खासदार एच. एच. फालेओमावेगा यांनी संसदेत केलेल्‍या भाषणात सांगितले की, मोदींच्‍या नेतृत्त्वगुणांमुळेच त्‍यांचे राज्‍य आज भारतातील एक मोठी आर्थिक सत्ता आहे. मोदींच्‍या यशानंतर अमेरिका गुजरातकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोन बदलेल, अशी आशा आहे. देशात तसेच परदेशातही रोजगार निर्मितीसाठी मोदींचे कार्य महत्त्वाचे आहे. अर्थव्‍यवस्‍था सुधारण्‍याच्‍या दृष्‍टीनेही मोदींचे कार्य उल्‍लेखनीय आहे. त्‍यामुळे आता मोदींबद्दल अमेरिकेचे विचार बदलायला हवे, असेही त्‍यांनी सांगितले.

फालेमोमावेगा हे आशिया, जागतिक पर्यावरण विषयक उपसमितीचे सदस्‍य आहेत. मोदींच्‍या समर्थनार्थ उघडपणे समोर येणारे ते पहिलेच खासदार आहेत. ते म्‍हणाले, मोदींची दूरदृष्‍टी असाधारण आहे. त्‍यांच्‍या नेतृत्त्वामुळेच गुजरात आर्थिक सत्ता आहे. फोर्ड आणि जनरल मोटर्ससारख्‍या कंपन्‍या आज गुजरातमये कारखाने लावत आहेत. हे पाऊल अमेरिका-भारत व्‍यापाराला बळकटी देणारे आहे.

Next Article

Recommended