आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Spying Disclosed Youth Disappeared In Honkong

अमेरिकेची हेरगिरी चव्हाट्यावर आणणारा तरूण हाँगकाँगमध्ये बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन/हाँगकाँग- भारतासह जगभरातील टेलिफोन, इंटरनेट सेवेवर निगराणी ठेवणा-या अमेरिकेच्या कार्यक्रमाचा भंडाफोड करणारा अमेरिकी तरुण हाँगकाँगमध्ये बेपत्ता झाला आहे. एडवर्ड स्नोडेन असे या तरुणाचे नाव असून ब्रिटनच्या द गार्डियन वृत्तपत्राला मुलाखत देऊन त्याने अमेरिकेची हेरगिरी चव्हाट्यावर आणली होती.


अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएमध्ये तो तांत्रिक सहायक होता.सोमवारी त्याने हाँगकाँगच्या हॉटेलमधून चेकआऊट केले. त्यानंतर त्याचा अद्यापही ठावठिकाणी लागलेला नाही. मात्र तो हाँगकाँगमध्येच असण्याची शक्यता आहे.अत्याचारातून लोकांना मुक्त करण्याची माझी जबाबदारी आहे असे वक्तव्य त्याने केले होते. 20 मे रोजी तो हाँगकाँगला आला होता.अमेरिकी नागरिकांना हाँगकाँगमध्ये आल्यानंतर व्हिसा दिला जातो तो तीन महिने वैध असतो.असे वृत्त बीबीसीने दिले आहे. ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत स्नोडेन याने अमेरिकन सुरक्षा संस्थांच्या कारवायांचा भंडाफोड केला होता.