आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Staff Get Permonth One Lakh And Half Rupee, Obama Declared

अमेरिकी कर्मचा-यांना वेतनवाढ दरमहा दीड लाख रुपये, ओबामांची घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या वेतनात भरघोस वाढ करण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी आपल्या अभिभाषणात केली. फेडरल कर्मचा-यांचे ताशी वेतन 10.10 डॉलर करण्याची घोषणा ओबामा यांनी केली. महिलांनाही समान वेतन देण्यास वचनबद्ध असल्याचे सांगून देशातील द्रारिद्र्य दूर करण्याचा संकल्प केला. श्रीमंत-गरिबांमधील आर्थिक विषमता दूर करताना संसदेचा अडथळा आल्यास नकाराधिकाराचा वापर करू, असेही त्यांनी ठणकावले.
अमेरिकी संसद काँग्रेससमोर ओबामांचे हे सहावे वार्षिक अभिभाषण होते. यंदाचे वर्ष हे कृतीचे (इयर ऑफ अ‍ॅक्शन) असेल, असे वचन त्यांनी नागरिकांना दिले. फेडरल सरकारच्या सर्व कंत्राटदारांकडील कामगार -कर्मचा-यांना वेतनवाढ देण्याची घोषणा केल्यामुळे सुमारे 20 लाख कर्मचा-यांना त्याचा फायदा होणार आहे. मात्र, फेडरल कर्मचा-यांप्रमाणेच विविध राज्यांतील प्रत्येक कामगार - कर्मचा-याला त्याचा फायदा मिळावा यादृष्टीने सर्व राज्यांचे गव्हर्नर, मेयर आणि विधिमंडळातील सदस्यांनाही त्यांनी राज्यातील कर्मचा-यांची वेतनवाढ करण्याचा सल्ला दिला.
2008 च्या आर्थिक मंदीनंतर सहा वर्षे निघून गेली आहे.अमेरिकेची अर्थव्यवस्था इतर देशांपेक्षा अद्यापही मजबूत आहे, असे सांगून रोजगार वृद्धीस चालना देणा-या उद्योगांना कर सवलती दिल्या जातील, असे सांगून रिपब्लिकन सदस्यांनी वाद सोडून सहकार्याचे धोरण ठेवावे. असे ते म्हणाले. परराष्ट्र धोरणासह सर्व विषयांना स्पर्श करणा-या 76 मिनिटांच्या अभिभाषणात त्यांनी भारताचा चकार शब्दानेही उल्लेख केला नाही. आशिया-प्रशांत क्षेत्राकडे विशेष लक्ष असेल, असे सांगून भविष्यातील सुरक्षा आणि समृद्धीसाठी तसेच संकटाच्या काळातही आशियातील सहकारी राष्ट्रांना यापुढेही मदत सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.
इराणप्रश्नी भूमिका
इराणवर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे ते बोलणीसाठी तयार झाले. अणू कार्यक्रमावर बोलणी सुरू असल्याने काँग्रेसने पुन्हा निर्बंध लादण्याचा प्रयत्न केल्यास ही बोलणी फिसकटण्याची शक्यता आहे, असे सांगून इराणवर नव्याने निर्बंध लादण्याचा ठराव केल्यास नकाराधिकार (व्हेटो) वापरून हा ठराव रोखू. चर्चेच्या मार्गानेच हा प्रश्न मार्गी लावण्याची संधी आपण घेतली पाहिजे, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.
घसरती लोकप्रियता सावरण्याचा प्रयत्न
ओबामांचे अर्थचक्र : सरकारी तसेच खासगी क्षेत्रात किमान वेतनात वाढ करण्याचा सल्ला त्यांनी उद्योग जगतालाही दिला. वेतनवाढीचा सर्व कुटुंबांना फायदा होईल. साहजिकच नागरिकांच्या हातात पैसा खुळखुळल्याने ते अधिक खर्च करतील. त्यामुळे उद्योग क्षेत्रालाही चालना मिळेल, असे ओबामांनी सांगितले.
महिलांना समान वेतन : महिलांना समान वेतन देण्यास कटिबद्ध असल्याचे ओबामा म्हणाले. आजघडीला देशात पुरुष व महिला नोकरदारांची संख्या समान आहे. मात्र, पुरुषांच्या एक डॉलरच्या तुलनेत महिलांची कमाई 77 सेंट्स आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही समान वेतन मिळण्याचा हक्क आहे. त्यामुळे सरकारसोबतच काँग्रेस, व्हाइट हाऊस, वॉल स्ट्रीटवरील उद्योग जगतापासून ते थेट रस्त्यावरील उद्योगांपर्यंत सर्वांनीच महिलांना समान वेतन दिले पाहिजे. महिला यशस्वी ठरल्यास अमेरिकाही यशस्वी ठरेल, असे ओबामा म्हणाले.
वेतन रचना : अमेरिकेत तासावर वेतन दिले जाते. 10.10 डॉलर प्रतितास असे म्हटल्यास भारतीय चलनातील वेतन 631.149 रुपये प्रतितास होते. म्हणजे आठ तासांचे सुमारे 5049 रुपये रोज व दरमहा सुमारे 1 लाख 51 हजार 470 रुपये किमान वेतन अमेरिकी फेडरल कर्मचा-याला मिळेल. हे वार्षिक पॅकेज 18 लाख 17 हजार 640 रुपयांचे असेल, असा अंदाज आहे.