आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Teenager Timothy Doner Teaches Himself 23 Languages, Including Hindi

एका आठवड्यात हिंदीसह 23 भाषा फाडफाड बोलायला शिकला हा अमेरिकी तरुण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - एखाद्या सामान्य व्यक्तीला तीन किंवा चार भाषा येतात, परंतु एक अमेरिकी किशोरवयीन मुलगा खर्‍याअर्थाने बहुभाषी ठरला आहे. जगभरातील 23 भाषांवर त्याची हुकूमत आहे. हिंदीसह एवढय़ा भाषा तो केवळ काही आठवड्यांत शिकला आहे. टिमॉथी डोनर असे या किशोरवयीन मुलाचे नाव आहे. यू-ट्यूबवर त्याने आपले कौशल्य दाखवणारे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जगाला ही गोष्ट पटली. व्हिडिओमध्ये तो सलग 20 भाषा बोलताना दिसला आहे. त्याने काही आठवड्यांतच ही किमया करून दाखवली आहे. म्हणूनच भाषा तज्ज्ञांनी बहुभाषिक कौशल्याबद्दल त्यास हायपरपॉलिग्लॉट अशी संज्ञा दिली आहे.
कोणत्या भाषा येतात : हिंदी, अरेबिक, कोरेशियन, डच, इंग्लिश, फारसी, फ्रेंच, र्जमन, हॉसा, हिब्रू, इंडोनेशियन, मंडारिन, ऑजिब्वे, पर्शियन, पश्तू, रशियन, स्पॅनिश, स्वाहिली, तुर्की, वोलोफ, इदिश