आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकन डिग्रीच्या प्रेमापोटी लुटले जाताहेत चिनी विद्यार्थी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शांघाय विद्यापीठाचा विद्यार्थी डेव्हिड झूचे इंग्रजी फारसे चांगले नाही. परंतु तरीही त्याला आरेगन स्टेट विद्यापीठात बिझनेसच्या डिग्री कोर्ससाठी प्रवेश घेताना कोणतीही अडचण आली नाही.
आपल्या मुलाला अमेरिकेत शिक्षण देण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी जवळपास 87 लाख रुपये जमवले. इंग्रजी खराब असल्याने त्याच्या पालकांनी दोन लाख 20 हजार रुपये देत शांघायच्या हुआशेन इंटरनॅशनल एज्युकेशन कंपनीची सेवा घेतली. प्रवेशाचा अर्ज भरताना तसेच एक निबंध लिहिताना त्याला कंपनीच्या सेवेची मदत झाली. झूच्या मते, काही विद्यार्थी स्वत:च निबंध लिहितात, तर काही जणांचे निबंध कंपनी लिहून देते. झूसारख्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
चीन आणि भारतासारख्या विकसनशील
देशातील पालक पाल्यांना अमेरिकेत डिग्री मिळवून देण्यावर भर देतात. उच्च शिक्षणासाठीचा सर्वात मोठा ब्रॅँड म्हणून ओळखल्या जाणाºया हार्वर्ड, येल, आॅक्सफोर्ड आणि केम्ब्रिजकडे परदेशी विद्यार्थ्यांचा ओढा आहे. शिक्षणाच्या बजेटमध्ये कपात झाल्याने सामान्य प्रायव्हेट कॉलेज आणि मोठ्या स्कूलची चलती आहे. अमेरिकी विद्यार्थ्यांच्या तुलनेत परदेशी विद्यार्थी दुप्पट किंवा तिप्पट फी देतात. यामुळे त्यांच्यावर प्रायव्हेट कॉलेजचे लक्ष असते. परदेशी विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा सप्लायर असलेल्या चीनमध्ये विद्यार्थ्यांना अमेरिकेत अ‍ॅडमिशन देण्याचा व्यवसाय आता मोठ्या उद्योगात परावर्तित होत आहे. अ‍ॅडमिशनसाठी काही एजंट फसवेगिरी आणि भ्रष्टाचाराचाही आधार घेत आहेत.
चिनी विद्यार्थी अभ्यासासाठी अमेरिकेत जात असल्याने त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. 2010-11 मध्ये जवळपास 57,000 चिनी विद्यार्थी अमेरिकेत आले होते. पाच वर्षांपूर्वी हीच संख्या 10,000 होती. चीनच्या श्रीमंत लोकांची माहिती देणारे मासिक ‘हरून रिपोर्ट’नुसार 85 टक्के श्रीमंत चिनी पालक पाल्यांना शिक्षणासाठी विदेशात पाठवण्याचा विचार करतात. चीनच्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणाºया ‘गावकाव’ परीक्षेत नापास होणाºयांनाही अमेरिकेत सहजरीत्या प्रवेश मिळतो. दुय्यम दर्जाचे अमेरिकन कॉलेज केवळ पैशांसाठी अशा विद्यार्थ्यांना प्रवेश देते. प्रवेश प्रक्रियेची माहिती नसल्याने तसेच इंग्रजी खराब असल्याने दलालाच्या मदतीशिवाय कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे कठीण असते. अमेरिकेतील कॉलेजमध्ये स्कॉलरशिपसाठी चिनी विद्यार्थ्यांची मदत करणाºया ‘जिंच चायना’ कंपनीनुसार 10 पैकी 8 चिनी विद्यार्थी अ‍ॅप्लिकेशन भरण्यासाठी एजंटची मदत घेतात.
एजंटांतील स्पर्धेमुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर फसवेगिरी सुरू झाल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. इंडिपेंडंट एज्युकेशनल कन्सल्टेयट्स असोसिएशन, वॉशिंग्टनचे प्रमुख मार्क स्क्लारो यांच्या मते, ही गंभीर समस्या आहे.
चीनमध्ये अशा प्रकरच्या एजन्सीजवर कोणतेही नियंत्रण नाही. सध्याची यंत्रणा बनावट दस्तऐवज तयार करण्यासाठी एजंट्सना सहायक ठरत आहे. जिंच्या मते एजंटांना विद्यार्थांसोबतच अमेरिकी कॉलेजकडूनही कमिशन मिळते. कॉलेज अ‍ॅडमिशन कौन्सिलच्या राष्ट्रीय असोसिएशन (एनएसीएसी)तर्फे विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे प्रमुख फिलीप बेलिंजर म्हणतात, जर आगामी काळात अशाच प्रकारे पैशांचा दबाव वाढत राहिला तर विद्यार्थ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष होईल.
आॅक्टोबरमध्ये ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील प्रमुख बोर्डिंग स्कूलमध्ये जागा मिळवण्यासाठी एजंटची मदत घेणाºया चिनी विद्यार्थ्यांना अपंगांच्या एका प्रायव्हेट हायस्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला.
अमेरिकी विद्यार्थ्यांच्या भरतीसाठी कमिशन देण्यास कायद्याने बंदी आहे. हा नियम विदेशी विद्यार्थ्यांसाठी लागू होत नाही. अमेरिकी कॉलेजस्ला एजंट ठेवण्यास परवानगी दिल्याने व्यावसायिक दर्जा सुधारेल, असे स्टेट युनिव्हर्सिटी न्यू यॉर्कमधील ग्लोबल विषयाचे व्हाइस चान्सलर मिच लेवेंथाल यांचे म्हणणे आहे. डेव्हिड झूनुसार त्यांच्या एजंटांनी निबंध देण्याशिवाय इतर कोणतेही फसवेगिरी केलेली नाही. परंतु, फसवेगिरी तर अनिवार्य वाईटपणा बनला आहे.
चीनमध्ये काही शाळांच्या परीक्षा अत्यंत कठीण आहेत. यात विद्यार्थ्यांना कमी मार्क्स मिळतात. यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी जायचे असते, त्यांना मार्क्स वाढवून घ्यावे लागतात.