आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकी महिला थेट युद्धभूमीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिका आता महिला सैनिकांना युद्धात सामावून घेणार आहे. याआधी महिलांना युद्धाच्या आघाडीवर पाठवण्यास बंदी घालण्यात आली होती. संरक्षणमंत्री लियोन पनेट्टा यांनी गुरुवारी लष्करप्रमुख मार्टिन डिंपसे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर ही घोषणा केली.

महिला सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्यास 1994 मध्ये बंदी लादण्यात आली होती. महिला सैनिकांनी युद्धक्षेत्राजवळ काम करता यावे यासाठी गेल्या वर्षी 14,500 पदे भरण्यात आली. अमेरिकी लष्कराच्या 14 लाख सैनिकांमध्ये महिलांची संख्या 14 टक्के आहे. इराक व अफगाण युद्धात अमेरिकी महिला सैनिकांनी आरोग्य कर्मचारी, लष्करी पोलिस व गुप्तचर अधिकारी म्हणून काम केले. त्यांना अनेकदा कारवाईमध्ये सामावून घेण्यात आले. मात्र, त्यांच्यावर मोठी जबाबदारी
सोपवण्यात आली नाही.या युद्धात 2012 मध्ये 130 महिलांचा मृत्यू झाला होता.

काय फरक पडणार अमेरिकी महिला सैनिकांना युद्धाच्या आघाडीवर तैनाती मिळेल
विशेष कमांडो पथकातील नियुक्तीसाठी दरवाजा खुला
आघाडीवर दोन लाख 30 हजार महिलांची नियुक्ती होणार
का घेतला निर्णय
युद्धभूमीवरील तैनातीची बंदी घटनाबाह्य असल्याचे सांगून, संरक्षण मंत्रालयाविरुद्ध चार महिलांनी खटला दाखल केला होता.