वॉशिंग्टन - अमेरिकेने शुक्रवारी 238 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने कॅपिटल इमारतीसह अनेक ठिकाणी आतषबाजी करण्यात आली. न्यूयॉर्क शहर रोषणाई आणि आतषबाजीने न्हाऊन निघाले होते. दाहीदिशा उजळून निघाल्याचे पाहायला मिळाले.
परेडचे आकर्षण
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कॉन्स्टिट्यूशन अॅव्हेन्यू येथे सैन्य दलाच्या वतीने शाही संचलन करण्यात आले. त्यात विविध प्रकारचे बँड, देखावे असणार्या गाड्या, महाकाय फुगे इत्यादी आकर्षण ठरले.
व्हाइट हाऊसही राष्ट्रीय उत्सवात मागे नव्हते. शुक्रवारी साऊथ लॉन येथे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि प्रथम महिला मिशेल यांच्या वतीने लष्करी कुटुंबीयांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्राध्यक्षांनी या निमित्ताने लष्करी जवान आणि त्यांच्या आप्तांना शुभेच्छा दिल्या.