भारतात शाळेत जाणा-या प्रत्येक मुलाला माहीत असते, की पृथ्वी सूर्याभवती फिरते. ही गोष्टी एवढी साधी गोष्ट मात्र प्रगतीच्या गप्पा करणा-या अमेरिकेतील लोकांना माहीत नाही. ही माहिती 'अमेरिका राष्ट्रीय विज्ञान' या संस्थने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाली आहे. या सर्वेक्षणात 2200 लोकांना सहगाभी करून घेण्यात आले होते. सर्वेक्षणामध्ये भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. विचारण्यात आलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तरे फक्त 6.5 टक्के लोकांनी दिली.
शुक्रवारी विज्ञान विषयावर अमेरिकेच्या असोशिएशनने एक परिसंवाद आयोजित केला होता. यावेळी सर्वेक्षणाचा अहवाल मांडण्यात आला. सर्वेक्षणानुसार,. 74 टक्के लोकांनी पृथ्वी सूर्याभवती फिरते का? या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले.
अमेरिकेत प्रत्येक दोन वर्षांनी हे सर्वेक्षण घेण्यात येते. या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल संसद व राष्ट्राध्यक्षासमोर सादर केला जातो. विज्ञानांच्या प्रगतीसाठी सरकारने बजेटमध्ये तरतूद करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.