आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करातील वाढत्या लैंगिक अत्याचारामुळे ओबामाही काळजीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन लष्करात भरती होणारे नवे अधिकारी हे ऐकू शकणार नाहीत की, ते ज्या संस्थेशी नाते जोडत आहेत ती एक महत्त्वपूर्ण मिशन पूर्ण करू शकलेली नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना अशा आशयाचा संदेश दिला आहे. अन्नापोलिसमध्ये 206 महिलांसह 1047 नव्या सैनिकी पदवीधरांना ओबामांनी सांगितले, जे लोक लैंगिक अत्याचार करतात ते फक्त गुन्हाच करीत नाहीत, तर लष्कराला बळकट बनवणार्‍या विश्वास व शिस्तीला हानी पोहोचवत आहेत. वेस्ट पॉइंटवर संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी सेनेच्या 1007 (137 महिलांसह) नव्या सेकंड लेफ्टनंट्सला लैंगिक अत्याचाराच्या शापाशी लढण्याचे आदेश दिले.

लष्करातील लैंगिक अत्याचाराविरुद्ध कडक पावले उचलण्यासंबंधी सिनेटर्सला कित्येक दशकांपासून पेंटागॉन केवळ खात्री देत आहे. अमेरिकन सिनेटमधील वीस महिलांच्या उपस्थितीत आता नियम बदलू शकतात. लैंगिक अत्याचारासह मोठय़ा गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यकक्षेतून काढून घेण्याचा आग्रह न्यूयॉर्कच्या डेमोक्रेटिक सिनेटर किर्सटेन गिलीब्रांड धरत आहेत.