आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • America's Planned Cia Chife Converted Religion In Saudi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेच्या नियोजित सीआयएप्रमुखाने सौदीत बदलला धर्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचे भावी प्रमुख जॉन ब्रेनन यांनी 1990 च्या दशकात इस्लाम धर्म स्वीकारला होता, असा दावा एफबीआयच्या माजी एजंटाने मंगळवारी केला.

राष्‍ट्रा ध्यक्ष ओबामा यांनी ब्रेनन यांना 7 जानेवारी रोजी सीआयए प्रमुखपदी नियुक्त केले असून सिनेटची त्याला मंजुरी मिळणे बाकी आहे. एफबीआयचे माजी एजंट ग्वानडोलो यांनी एका नभोवाणीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ब्रेनन 1996 ते 1999 दरम्यान सौदी अरेबियात केंद्रप्रमुख होते. त्या वेळी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला असल्यामुळे ते सीआयएप्रमुख होण्यास योग्य नाहीत.

ग्वानडोलो 2008 मध्ये एफबीआयमधून निवृत्त झाले आहेत. सौदी अरेबियातील अधिका-या सोबत आपण मुस्लिमांचे पवित्र शहर मक्का व मदिनाला गेलो होतो. त्या वेळी आपणाला धर्मांतर करण्यासाठी तयार करण्यात आले होते, असे ब्रेनने यांनी म्हटले आहे. अल अरबिया न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ग्वानडोलो यांनी ट्रेंटो रेडिओ शोमध्ये म्हटले की, ब्रेनन हजदरम्यान मक्का व मदिनाला गेले होते. ब्रेनन 57 वर्षांचे असून तीन दशकांपासून सीआयएमध्ये कार्यरत आहेत.