आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी सरकारची हेरगिरी बेकायदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- दहशतवादाचा बागुलबुवा उभा करून अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) हजारो अमेरिकी नागरिकांचे लाखो ई-मेल्स बेकायदा तपासले असल्याचे आता उघड झाले आहे. न्यायालयास अंधारात ठेवून एनएसएच्या कारवाया सुरू होत्या, असे अमेरिकी सरकारच्या गोपनीय दस्तऐवजांवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे दहशतवादी कारवायांशी संबंध नसलेल्या हजारो नागरिकांचे ई-मेल्स बेकायदा खंगाळण्यात आले.

सॅनफ्रॅन्सिकोतील इलेक्ट्रॉनिक फ्रंटियर फाउंडेशन या संस्थेने माहिती अधिकार कायद्याखाली दाखल केलेल्या याचिकेनंतर अमेरिकी सरकारचा गोपनीय दस्तऐवज खुला करण्यात आला आहे. या दस्तऐवजानुसार परदेशी गुप्तचर निगराणी न्यायालयाने एनएसएच्या उपद्व्यापाबद्दल चिंता व्यक्त केली होती. परकीय गुप्त माहिती मिळवण्याच्या नावाखाली एनएसएने बेकायदेशीरपणे इंटरनेटवरील माहिती गोळा केल्याचे न्यायालयाने दोन वर्षांपूर्वीच नमूद केले होते.

न्यायालयाची दिशाभूल
परकीय गुप्तचर निगराणी न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती जॉन डी. बेट्स यांनी 3 आॅक्टोबर 2011 रोजी टिपण दिले होते. यामध्ये अमेरिकी सरकारने वारंवार न्यायालयाची दिशाभूल के ल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. सरकारने गोळा केलेली प्रचंड माहिती पाहता न्यायालयास दिलेली माहिती व प्रत्यक्ष माहिती यामध्ये जमीन-अस्मानचा फरक असल्याचे बेट्स यांनी म्हटले आहे.