आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America's Three Person Made World Record To Seeing 87 Hours Television

अमेरिकेतील तिघांनी 87 तास दुरचित्रवाणी पाहुन नोंदवला जागतिक विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिकेतील तिघांनी सलग 87 तास टीव्ही पाहून गिनीज बुकामध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. डॅन जॉर्डन, स्पेसर लार्सन आणि ख्रिस लॉघलिन या तिघा जणांनी लास वेगास येथे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सशोदरम्यान सलग पाच दिवस टीव्ही कार्यक्रम पाहून नवा विक्रम प्रस्थापित केला. त्याआधी या महिन्यात नेवाडामध्ये हा विक्रम करण्यात आला होता.
गिनीजच्या नियमानुसार तिघांना दर तासाला पाच मिनिटांचा ब्र्रेक देण्यात आला. पाच मिनिटांच्या विश्रांतीशिवाय तिघांपैकी एकाला जास्तीत जास्त 80 मिनिटांपर्यंत झोप घेण्याची परवानगी देण्यात आल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले. तिघांनी पाहिलेल्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. विक्रमाच्या कालावधीत स्पर्धकांना टीव्हीवरील वाहिन्या बदलण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, पाच मिनिटांच्या विश्रांतीत त्यांना बोलण्याची, फोनवर बोलण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.