आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America's Western Bridge Hit By Ice Cyclon ; 10 Inch Ice On Road

अमेरिकेच्या पूर्वकिना-याला हिमवादळाचा फटका ; रस्त्यावर 10 इंच बर्फ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिकागो - अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील शहर शिकागोला मंगळवारी हिमवादळाचा फटका बसला. रस्त्यावर सुमारे दहा इंचाचा बर्फ साचला आहे.
वॉशिंग्टनच्या दिशेने : माँटोना येथून निघालेले हे वादळ सोमवारी डाकोटा आणि मिनेसोटा येथे धडकले त्यानंतर विस्कॉन्सिन, इलिनॉईसहून हे वादळ वॉशिंग्टन डी.सी.ला धडकणार आहे.
चाकरमान्यांची धावपळ : हिमवादळाचा इशारा मिळाल्याने शिकागो, इलिनॉईस, विस्कॉन्सिनच्या चाकरमान्यांची धावपळ उडाली. अनेकांनी ऑफीस सोडून शाळा, पाळणाघरातून मुलांना घेऊन घराकडे धाव घेतली. अन्नधान्य, जिन्नस घेण्यासाठीही मॉल्समध्ये गर्दी झाली होती.
विमाने रद्द : शिकागो विमातळावरील मंगळवार, बुधवारची 1100 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.