छायाचित्रकार ग्रे मेलिन नुकतेच शिकागोत होते. त्यांनी येथे अनेक हवाई छायाचित्रे काढली. ते समुद्र तट, नॅवी पायर आणि मिलेनियम पार्क आदी ठिकाणांना भेटी दिल्या. तब्बल आठ वर्षांनंतर मेलिन शिकागोत आले होते. त्यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटिश कलाकार अनिश कपूर यांनी तयार केलेले ' क्लाऊड गेट'चे हवाई छायाचित्रे काढली आहे. त्यात ते शिकागोतील एक तलाव आहे असे वाटते. सोशल मीडियावरील अनेक संकेतस्थळांवर हवाई छायाचित्राबाबत चर्चा सुरु आहे. क्लाऊड गेटचे छायाचित्र माझ्यासाठी संस्मरणीय आहे, असे मेलिन यांनी सांगितले.
30 कलाकारांना अनिशने टाकले मागे
अनिश कपूर मुंबईचे आहेत. त्यांनी चेल्सिया स्कूल ऑफ आर्टमध्ये पदवी संपादन केली. त्यांना कलाकृत्या आणि वास्तूरचनांबाबत मास्टर मानले जातात. शिकागोच्या मिलेनियम पार्कमध्ये 2006 मध्ये त्यांनी स्टीलने बनवलेले क्लाऊड गेटची उभीरणी केली. गेटच्या उभारणीसाठी 30 कलाकारांना पसंती न देता अनिश कपूर यांना निवडण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा ग्रे मेलिनची काही छायाचित्रे...
सोर्स- tumblr.com