आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Angree Birds Spying Our Mobile, America Uses App For Stealing Information

‘अँग्री बडर्स’मुळे आपल्या मोबाइलचीही हेरगिरी!,अमेरिकेकडून माहिती चोरण्यासाठी अ‍ॅपचा वापर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तहेर संस्था अँग्री बर्ड्स आणि अन्य मोबाइल अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिक माहिती हस्तगत करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.
अँग्री बर्ड्स आणि अन्य अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाचे ठिकाण, त्याने पाहिलेल्या वेबसाइट्स आणि त्याच्या संपर्काशी संबंधित आकडेवारीसह अन्य माहितीची हेरगिरी करण्याचा सासत्याने प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनएसए) एका दस्तऐवजातून स्पष्ट झाले आहे. एडवर्ड स्नोडेनने जारी केलेल्या दस्तऐवजाद्वारे झालेले हे ताजे रहस्योद्घाटन आहे.
‘गोल्डन नगेट’ : एनएसएच्या एका दस्तऐवजात ‘गोल्डन नगेट’चे वर्णन आहे. ही प्रणाली एनएसएच्या विश्लेषकांना फोन कोणत्या नेटवर्कशी जोडलेला आहे, त्यावरून डाऊनलोड केलेले दस्तऐवज, पाहिलेल्या वेबसाइट्स आणि मित्रांची यादी उपलब्ध करून देते. फ्लिकर, फ्लिक्सटर हे चित्रपटावर आधारित सोशल नेटवर्किंग आणि फेसबुकशी संबंधित अन्य अ‍ॅप्लिकेशन्स आदींचा वापरही हेरगिरीसाठी केला जातो.
अँग्री बडर्सची वेबसाइट हॅक : अमेरिकी आणि ब्रिटिश गुप्तहेर संस्थांनी हेरगिरीसाठी अँग्री बर्ड्सचा वापर केल्याचे उघड झाल्यानंतर हॅकर्सनी अँग्री बर्ड्सची वेबसाइट हॅक करून होमपेजवर एनएसएचा लोगो लावला आहे.
जुनेच तंत्र
ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल इंटरनेट ट्रॅफिक आणि टेक्स्ट मेसेज अडवले जातात, त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून मॅपिंग, गेमिंग आणि सोशल नेटवर्किंग अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मोबाइल ग्राहकाची वैयक्तिक स्वरूपाची माहिती अमेरिकी गुप्तचर संस्थेने मिळवली, असे हा अहवाल सांगतो.
1.7 अब्ज स्मार्टफोनवर अँग्री बर्ड्स
जगभरातील 1.7 अब्ज स्मार्टफोनवर अँग्री बर्ड्स हे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यात आले आहे. अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमवर अँग्री बडर्स खेळणा-या लोकांची खासजी माहिती कशी काढून घेतली जाते, याचा तपशील 2012च्या जीसीएचक्यू अहवालात देण्यात आला आहे.