आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anjela Markel Once Again Won In German General Election

जर्मनीतील सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा चान्सलर 'अँगेला मर्केल' विजयी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन - जर्मनीच्या विद्यमान 64 वर्षीय चान्सलर अँगेला मर्केल यांना जनतेने देशाची सूत्रे सांभाळण्याची पुन्हा एकदा संधी दिली आहे. परंतु सार्वत्रिक निवडणुकीत मर्केल यांच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन बहुमत मिळाले नाही. तरीही सत्ताधारी आघाडीसाठी संसदीय निवडणुकीतील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.


देशाच्या 630 सदस्यीय बँडेस्टेज या कनिष्ठ सभागृहासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. निवडणुकीत सीडीयू व सत्ताधा-याचा सहकारी पक्ष ख्रिश्चन सोशल युनियनला (सीएसयू) 41.7 टक्के मते मिळवण्यात यश आले आहे. विरोधी पक्ष सोशल डेमोक्रॅट्स दुस-या स्थानी असून त्यांना 25.6 टक्के मते मिळाली आहेत. सत्ताधा-यांना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत अधिक मते मिळाली असली तरी बहुमत मिळवता आलेले नाही. सीडीयू पक्षाने पूर्वी केवळ 1957 मध्ये बहुमत मिळवून स्वबळावर सत्ता संपादन केली होती. पहिल्या महायुद्धानंतर चान्सलर कोन्राड अडनॉर यांच्या नेतृत्वाखाली देशाने एका पक्षाची सत्ता पाहिली होती. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सोमवारी पक्षाच्या बर्लीन मुख्यालयात आनंदोत्सव साजरा झाला.


तिसरा नेता
जर्मनीमध्ये चान्सलर या सर्वाेच्च् कार्यकारी पदाचा चार वर्षांचा कार्यकाळ सतत दोन वेळा पूर्ण करून तिस-यांदा त्यावर निवडून येण्याचा बहुमान अँगेला मर्केल यांना मिळाला. देशाच्या राजकीय इतिहासात तीन वेळा या पद सांभाळणा-या त्या केवळ तिस-या व्यक्ती ठरल्या आहेत.


कणखर नेतृत्व : जर्मनी ही युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. मंदीच्या काळात युरोपियन संघटना हादरली होती. त्या अस्थिरतेच्या काळातही सदस्य असलेल्या जर्मनीचा दबदबा मात्र तसूभरही कमी झालेला नव्हता. देशातील नागरिकांचे जीवनमान उच्च् प्रतीचे राहिले. अजुनही तोच दर्जा पाहायला मिळतो. युरोपात मंदीचे वारे वाहत असतानाही जर्मनीला आर्थिक स्थैर्य, बेरोजगारीचा दर कमी राखण्यात यश आले. त्याचे श्रेय 59 वर्षीय मर्केल यांच्या कणखर नेतृत्वाला दिले जाते.


सीडीयूचा विजय
सार्वत्रिक निवडणुकीत मिळालेला कौल हा सरकारच्या धोरणावरील आत्मविश्वासाचे फलित आहे. एकूणच या मोठ्या विजयाचे श्रेय सीडीयूचे आहे.’’
अँगेला मर्केल, चान्सलर


ध्येयपूर्ती नाही
मर्केल यांचे विजयाबद्दल अभिनंदन. सार्वत्रिक निवडणुकीत आम्हाला मात्र निश्चित ध्येय गाठता आले नाही.’’
पीर स्टीनब्रुक, प्रतिस्पर्धी,एसपीडीचे उमेदवार.


311 जागी सीडीयू व सीएसयू विजयी
192 जागी एसपीडी विरोधी पक्ष.


एफडीपी सत्तेतून बाहेर
सीडीयूचा मित्र पक्ष असलेल्या लिबरल फ्री डेमोक्रॅटिक पार्टीला (एफडीपी) संसदेत पोहचण्यासाठी आवश्यक असणारी पाच टक्के मते मिळवता आलेली नाहीत. मर्केल यांच्या महाआघाडीमध्ये एफडीपीचाही सहभाग होता. निवडणुकीत अपेक्षित कौल मिळाला असता तर एफडीपी सत्तेमध्ये सहभागी झाले असते. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी आपण घेत असल्याचे अध्यक्ष फिलीप रॉसलर यांनी घेतल्याचे जाहीर केले.


नवी आघाडी
एफडीपीच्या पराभवामुळे मर्केल यांना आता नवीन आघाडीची मोट बांधावी लागणार आहे. विरोधी पक्ष सोशल डेमोक्रॅटिक पार्टीला (एसपीडी) सोबत घेऊन किंवा अन्य पक्षांना सोबत घेऊन महाआघाडीची स्थापना करून सत्ता समीकरणे जुळवली जाऊ शकतात. एसपीडीचे उमेदवार पीर स्टीनब्रुक यांनी निवडणूक प्रचारात प्रचंड आक्रमकता दाखवली होती. त्याला जर्मन नागरिकांनी दाद दिली नाही. 2005 व 2009 च्या काळात स्टीनब्रूक मर्केल मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते. परंतु नवीन आघाडीत सामील
होण्याची शक्यता मात्र स्टीनब्रुक यांनी फेटाळून लावली.