Home | International | China | another cyber attack from china but this time on india, international

चीनचा आता भारतावर सायबर हल्ला; वरिष्ठ अधिकाऱयांचे ईमेल हॅक

agency | Update - Jun 04, 2011, 12:53 PM IST

चीनने आता भारतीय दूतावासातील अधिकाऱयांचे ई-मेल अकाऊंट हॅक केले आहेत.

  • another cyber attack from china but this time on india, international


    cyber_359बीजिंग- चीनने अमेरिकेच्या वरिष्ठ प्रशासन व सैनिकी अधिकारी यांचे मेल हॅक केल्याचे उघड झाल्यानंतर आता त्यांनी बीजिंगमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱयांचे जीमेल अकाऊंट हॅक केले असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी अशी शंका व्यक्त केली आहे त्यांची गूगल अकाऊंटवर निशाना साधला आहे.
    चीनमध्ये यापूर्वी दूतावासात काम केलेल्या काही अधिकाऱयांनी याआधीही असे प्रकार घडल्याचे म्हटले आहे. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, ''हॅकरनी आमची जीमेल अकाऊंट प्रथम हॅक व नंतर त्याचे पासवर्ड बदलून काही मेल पाठविले. ईमेलमधील सेंटिंगही बदलल्या.''    गूगलने बुधवारी म्हटले होते की, गूगलच्या अकाऊंटवर सायबर हल्ले केले असून ते चीनमधून झाले आहेत. तसेच हे हल्ले बहुतांशी वरिष्ठ प्रशासन अधिकारी, सैनिक अधिकारी, दूतावासातील अधिकारी व पत्रकार यांच्यावर झाले आहेत. दरम्यान, चीनने असे प्रकार होत असल्याबद्दलचे सर्व आरोप नाकारले आहेत.Trending