आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उल्कापात : नेहमी पडणा-या प्रश्‍नांची उत्तरे खास तुमच्यासाठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


*पृथ्वीवर दररोज 4 अब्ज उल्कांचा वर्षाव होतो. पण आकाराने लहान असल्यामुळे त्यापासून फार नुकसान होत नाही.
*उल्कापाताच्या अनेक बातम्या येत असतात. पण रशियात यापूर्वी फक्त एकाच घटनेचा शास्त्रशुद्ध पुरावा मिळाला आहे. 1954 मध्ये सायलाकोगा येथे राहणारे अ‍ॅनी होजेस त्यांच्या घरी झोपले होते. सुमारे 4 किलो वजनाची एक उल्का घराचे छत भेदून त्यांच्यावर कोसळली.
*पुढील 20 वर्षांत होणा-या सुमारे 1 लाख उल्कांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा बचाव करण्यासाठी केव्हलेटचे आवरण घालण्यात आले आहे. बुलेटप्रूफ कपडे शिवण्यासाठी हे मटेरियल वापरले जाते.
*दूरवर संपर्क साधण्यासाठी नाटो आणि राष्ट्रीय हवामान सेवा उल्कांनी आयनीभवन केलेल्या हवेच्या शेपटीवरून रेडिओ लहरी परावर्तीत करतात.
*सर्वात प्रसिद्ध आणि नयनरम्य असा उल्कावर्षाव दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी पाहता येतो. यंदा कदाचित हा उल्कावर्षाव आपल्याला पाहता येणार नाही, कारण त्या वेळी आकाशात संपूर्ण चंद्राचा प्रकाश पसरलेला असेल.
*उल्का म्हणजे या सौरमंडळातील सर्वात जुने डोंगर असतात. आपली सूर्यमाला बनण्यापूर्वीही ता-याच्या आस-पास अब्जावधी वर्षांपूर्वी त्यांची निर्मिती झाली होती.
*उल्का कायदेशीर पद्धतीने खरेदी केल्या जाऊ शकतात. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटवरून दरवर्षी हजारपेक्षा जास्त उल्कांचा लिलाव केला जातो.
* तुम्हालाही एखादी उल्का सापडल्यास नॉमेनक्लेचर कमिटी ऑफ मीटियोरिटिकल सोसायटीला तिच्यातील 20 टक्के भाग किंवा 20 ग्राम भाग संशोधनासाठी देण्याचे आवाहन सोसायटीने केले आहे. उल्केचा उर्वरित भाग तुम्ही विकू शकता.
iscoverymagazine.com