आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Answer Will Be Given Over Attacking On Sony Obama

\'सोनी\'वरील सायबर हल्ल्याचे उत्तर देऊ -बराक ओबामा यांचे सडेतोड उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सोनीपिक्चर्सवर झालेल्या सायबर हल्ल्यास सडेतोड उत्तर दिले जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. दुसरीकडे संशयाची सुई असलेल्या उत्तर कोरियाने अमेरिकेसह या प्रकरणाची संयुक्त चौकशी करण्यास आपली तयार असल्याचे म्हटले आहे.

सायबर हल्ला उत्तर कोरियाकडून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असतानाच शुक्रवारी बराक ओबामा यांनी हल्ल्याचे योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे सांगितले. त्यावर उत्तर कोरियाने तपासात सहभागी होण्याची तयारी दाखवली. परंतु केवळ आरोप लावण्यात आल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशारा दिला. अमेरिकेची गुप्तचर संस्था एफबीआयने सायबर हल्ल्यामागे उत्तर कोरिया असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी अमेरिकेने चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि रशियाची मदत मागितली आहे.

वादाच्या केंद्रस्थानी ‘इंटरव्ह्यू’
सोनीवरीलसायबर हल्ल्याच्या केंद्रस्थानी ‘इंटरव्ह्यू’ हा चित्रपट आहे. हा चित्रपट तूर्त प्रदर्शित होणार नाही. हा निर्णय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना आवडलेला नाही. त्यांनी त्याबद्दल जाहीर नाराजीदेखील व्यक्त केली. हा चित्रपट नाताळच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. त्याला पुढे ढकलण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात हल्ला
सोनीपिक्चर्सवर गेल्या महिन्यात हा सायबर हल्ला झाला होता. त्यात हॅकर्सने सोनी पिक्चर्सच्या सर्व्हरमधील खासगी तसेच व्यावसायिक आकड्यांची मोठ्या संख्येने चोरी केली होती.

उत्तर कोरियाची टिंगलटवाळी
उत्तर कोरियावर आधारित ‘इंटरव्ह्यू’मध्ये देशाच्या नेतृत्वाबद्दल टिंगलटवाळी करण्यात आली आहे. हा विनोदीपट असल्याचे सोनी पिक्चर्सचे म्हणणे आहे. उत्तर कोरियात हुकूमशाही पद्धती असून राष्ट्रप्रमुख ऊन यांच्या आदेशावरून देशाचा कारभार चालवला जातो. मानवी हक्काची पायमल्ली होत असल्याने कोरियावर नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाकडून टीका होते.