बीजिंग - पाण्याने भरलेली रंग-बेरंगी बादली आणि प्रत्येक बादलीच्या समोर एक विद्यार्थी. पुन्हा आवाज येतो..श्वास गुदमरल्याचा अनुभव घ्या. हो, डोक्याला पाण्याच्या आत जाऊ द्या. अनुभवा आपण पाण्यात डूबत आहोत.चीनच्या हेनन प्रांतात अशाच प्रकारची दृश्य पाहावयास मिळत आहे. वास्तवात, क्यानझिझुआंगच्या एका प्रायमरी शाळेत मुलांना'अँटी ड्राउनिंग लेसन'चे प्रशिक्षण दिले जात आहे.
जसे की छायाचित्रांमध्ये तुम्ही पाहू शकता, शिक्षकाच्या सूचनेनुसार मुलांनी श्वास रोखून आपले डोके पाण्याच्या आत बुडवले आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांची बुडताना कशा पध्दतीने तयारी असली पाहिजे. त्याची बारकावे समजण्यास मदत होते.समजा नदीत पडल्यास कोणत्या प्रकारची बचावात्मक भूमिका घ्यावयास हवी हे 'अँटी ड्राउनिंग लेसन'च्या माध्यमातून मुलांना शिकवले जाते. या दरम्यान मुलं आनंद घेताना दिसली. चीनमध्ये अशा प्रकारची चित्र-विचित्र ट्रेनिंग देण्याची ही पहिलीच घटना नाही.
पुढे पाहा ट्रेनिंगची काही छायाचित्रे....