आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिजैविके कुचकामी ठरू शकतात, शंभर वर्षांतील वैद्यकीय प्रगतीला सुपरबगचा धोका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - वैद्यकीय क्षेत्राच्या 100 वर्षांच्या इतिहासातील प्रगतीला मारक ठरू शकेल असा सुपरबग सध्या शास्त्रज्ञांच्या चिंतेचा विषय ठरला आहे. ‘लँसेट हेल्थ जर्नल’च्या विशेष संपादकीयात सरकारी डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार सुपरबग्ज बॅक्टेरियांवर कोणतेही औषध परिणामकारक ठरू शकत नाही. त्यामुळे हा सुपरबग 100 वर्षांतील वैद्यकीय प्रगती व संशोधने कुचकामी करू शकतो.
प्रतिजैविक व अँटिमायक्रोबॉइलचा धोका शास्त्रज्ञांना कैक वर्षांपासून माहीत आहे. मात्र, नव्या इशा-याने चिंता वाढली आहे. 20 वर्षांनंतर एखाद्या अवयवाचे प्रत्यारोपण झाले तर कदाचित इन्फेक्शन होईल व कोणतेही प्रतिजैविक त्यावर गुणकारी ठरू शकणार नाही. यात मृत्यूही ओढवू शकतो, असे ब्रिटनचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी प्रो. जॉन वॉटस्न यांनी म्हटले आहे. इंग्लंडमध्ये डॉक्टरांकडून दरवर्षी 3.5 कोटी प्रतिजैविके रुग्णांना दिली जातात. ज्या गतीने हा वापर होईल तेवढ्याच गतीने जिवाणू बचावाचा मार्ग शोधून काढतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.