Home | International | Other Country | anuj bidve murder: uk police offer 50000 pound reward for info

बिडवे हत्याप्रकरणी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी 50 हजार पौंडाचे बक्षीस

वृत्तसंस्था | Update - Dec 31, 2011, 11:52 PM IST

भारतीय विद्यार्थी अनुज बिडवे हत्याप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी माहिती देणा-यास 50 हजार पौंडाचे बक्षीस जाहीर केले.

  • anuj bidve murder: uk police offer 50000 pound reward for info

    लंडन - भारतीय विद्यार्थी अनुज बिडवे हत्याप्रकरणी ब्रिटिश पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी माहिती देणा-यास 50 हजार पौंडाचे बक्षीस जाहीर केले. सुमारे चार कोटी अकरा लाख रुपये अशी या बक्षिसाची रक्कम आहे. दुसरीकडे हत्येच्या घटनेची माहिती बिडवे कुटुंबीयांना कळवण्यास विलंब झाल्याबद्दल पोलिसांनी माफी मागितली आहे.
    ब्रिटिश पोलिसांनी बक्षिसाची रक्कम जाहीर करतानाच या घटनेची माहिती बिडवे परिवाराला देण्यास विलंब झाल्याची कबुली त्यांनी दिली. बिडवे कुटुंबाला अनुजच्या मृत्यूची माहिती फेसबुकवरून मिळाली होती, हे विशेष. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर ब्रिटनमधून संताप व्यक्त केला जात होता. 23 वर्षीय अनुजला जवळून गोळी मारण्यात आली होती. 26 डिसेंबर रोजी पहाटे ग्रेटर मँचेस्टर जिल्ह्यात तो आपल्या काही मित्रांसोबत एका हॉटेलजवळ फिरत असताना हा प्रकार घडला. ही कृती हेट-क्राइम किंवा वंशभेदातून झाली असावी, असे मँचेस्टर पोलिसांना वाटते.
    ही कृती अत्यंत अमानुष आणि उद्देशहिन अशी आहे. त्याचबरोबर हा गुन्हा तितकाच भयानक आहे. त्यामुळे आम्ही या घटनेच्या तपासात बक्षीस जाहीर करून गुन्हेगाराचा शोध घेण्याचे पाऊल उचलले आहे, असे ब्रिटिश पोलिसांच्या गुुप्तहेर विभागाचे मुख्य अधीक्षक मेरी डॉयल यांनी सांगितले. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सोळा व सतरा वर्षांच्या दोन मुलांची जामिनावर सुटका झाली आहे; मात्र 19 व 20 वर्षीय मुले अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Trending