आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ap Facility For The Remaining Food May Shared With Neghigour

उरलेले अन्न शेजा-यांना देण्यासाठी अ‍ॅपची सुविधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - घरातील अन्न वाया जाण्याची चिंता आता सोडा. कारण उरलेले अन्न तुम्ही शेजा-याला देऊ शकता. त्यासाठी नवीन अ‍ॅपची निर्मिती करण्यात यश आले आहे.


‘लेफ्टॉवर स्वॅप’ असे या अ‍ॅपचे नाव आहे. त्यामध्ये उरलेल्या अन्नाचा फोटो काढता येतो. हा फोटो नेहमीपेक्षी निश्चितच अधिक गुणवत्तेचा होईल, असे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्याशिवाय अन्नाबद्दलची माहितीदेखील पोस्ट करता येऊ शकते. अ‍ॅपमध्ये मॅप नावाचा विभाग आहे. त्याचा वापर करून अन्नपदार्थाला झूम करता येऊ शकते. शेजारी किंवा एखाद्या युजरला फोटो पाहून हा अन्नपदार्थ घेण्याची इच्छा झाली, तर तो युजर तत्काळ संवाद साधू शकतो. त्याचबरोबर अ‍ॅपच्या माध्यमातून भेट ठरवू शकतो. अ‍ॅप आणखी एका कारणासाठी महत्त्वाचे ठरते. विषबाधेपासून संरक्षण करण्यासाठीदेखील या अ‍ॅपचा उपयोग होऊ शकतो, असा दावा संशोधकांनी केला. लेफ्टॉवर स्वॅप बनवणा-यांच्या मते हा अ‍ॅप आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.