आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • APEC Country\'s Ready To Exchange Information About Corruption

भ्रष्टाचाराविरुद्ध एपेकचा एल्गार, सदस्यांत आर्थिक गैरव्यवहारांची माहिती देण्यावर सहमती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भ्रष्टाचार ही कळीची समस्या असून त्यावर तोडगा काढण्यासाठी आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य संघटनेच्या (एपेक) सदस्य राष्ट्रांमध्ये सहमती झाली आहे. शनिवारी २१ देशांनी परस्परांना माहिती देणारे नेटवर्क स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी एपेकच्या सदस्यांनी एका करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवली आहे. १० नोव्हेंबरपासून शिखर परिषदेला सुरुवात होणार आहे. ही बैठक दोन दिवस चालेल. परिषदेचे यजमानपद चीनकडे आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरियासह २१ देशांचे प्रतिनिधी दोन दिवसीय परिषदेत सहभागी होतील. त्यात भ्रष्टाचाराला रोखणे, बेकायदा पैसा आणि आर्थिक क्षेत्रातील आरोपींवर कारवाई करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्यात येईल.
प्रत्यार्पणातही अडथळे
मानवी हक्काची पायमल्ली करणाऱ्या देशांत चीन आघाडीवर असल्याने भ्रष्ट लोकांचे प्रत्यार्पण करण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे येत असल्याची चिंता अनेक देशांनी अगोदरच व्यक्त केली आहे.

चीनला भ्रष्टाचाराचा विळखा
चालू वर्षात चीनमध्ये १३ हजार अधिकारी भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या प्रकरणात दोषी आढळून आले होते. एपेकचा हा प्रयत्न भ्रष्टाचाराविरोधी मोहिमेच्या राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
आेबामा चीनच्या दौ-यावर
वॉशिंग्टन | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा रविवारी आशियाच्या दौ-यावर रवाना झाले. या दौ-यात ते चीन, म्यानमार आणि ऑस्ट्रेलियाला भेट देतील. आेबामा एपेक परिषदेला हजेरी लावतील. दोन्ही महासत्तेमधील संबंध जागतिक शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यानंतर आेबामा म्यानमानरचे राष्ट्राध्यक्ष थिन सिन यांची भेट घेतील. देशातील लोकशाही स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी या भेटीला महत्त्व आहे.