आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपोलो रॉकेट इंजिन अटलांटिक सागरात सापडले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - 40 वर्षांपूर्वी चांद्र मोहिमेवर पाठवण्यात आलेल्या अपोलो रॉकेटचे दोन इंजिने अटलांटिक सागराच्या तळातून हस्तगत केले आहेत. इंजिन 14,000 फूट खोल सागरात आढळले.अपोलो इंजिनची शोधमोहीम अँमेझॉन डॉट कॉमच्या संस्थापकाने हाती घेतली होती. अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने 16 जुलै 1969 रोजी शक्तिशाली इंजिन सॅटर्न-व्ही आणि 1973 मध्ये नवे पाच एफ-1 रॉकेट इंजिन पाठवले होते. यातील दोन इंजिनांचा शोध लागला आहे. अँमेझॉन डॉट कॉमचे सीईओ जेफ बेझोस यांनी 1969 च्या अपोलो 11 मोहिमेतील इंजिनचा शोध घेतला आहे. अपोलो 11 मोहिमेचा साक्षीदार राहिलेले एफ 1 इंजिन व्यवस्थित आहे. त्याची दुरुस्ती करून लोकांसमोर ते आणले जाईल, असे जेफ बेझोस म्हणाले. लॉँचिंगच्या वेळी या इंजिनाचा वापर अपोलो 11साठी पॉवर बुस्टरम्हणून केला होता. पहिल्या टप्पा पूर्ण झाल्यानंतर रॉकेट वेगळे झाले आणि सागरात कोसळले होते. याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात यश आले नाही.